आज शेअर बाजारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (Hindustan Aeronautics) शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव 52 आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला. चंद्रयान-3 (Chandrayaan-3) सोब या सरकारी कंपनीचे अत्यंत घनिष्ट नाते आहे. कंपनीने चंद्रयान-3 चे विक्रम लँडर (Vikram lander) तयार करणार आहेत. महत्वाचे म्हणजे, आज भारताचे चंद्रयान-3 चंद्रावर लँड करायचे आहे. जर हे यशस्वी ठरले तर,चंद्रच्या साउथ पोलमध्ये पाय ठेवणारा भारत पहिला देश बनेल.
3 दिवसांत 6 टक्क्यांचा परतावा - गेल्या तीन दिवसांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL Share Price) शेअरच्या किंमतीत 6 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर बुधवारी 3914.95 रुपयांवर खुला झाला होता. कंपनीचा आजचा इंट्रा-डे हाय 4034 रुपये एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, चंद्रयान-3 शिवाय HAL ने L&T सह 5 PSLV रॉकेट्सचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला होता. या प्रोजेक्टची किंमत 860 कोटी रुपये एवढी होती.
कंपनीचे दमदार प्रदर्शन - गेल्या एका वर्षात HAL च्या शेअरची किंमत 80 टक्क्यांनी वधारली आहे. थसेच, या सेक्टरचा एकूण परतावा 10.1 टक्के एढा आहे. एंजल वनशी संबंधित असलेल्या राजेश भोसले यांच्या मते, कंपनीच्या शेअरचा भाव येणाऱ्या काळात 4350 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)