Join us  

Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्समध्ये ७०९ अंकांची घसरण; निफ्टीच्या तेजीलाही ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 9:33 AM

Stock Market Today : जागतिक बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराला घसरणीसह सुरुवात झाली. प्री ओपनिंग सत्रातच निफ्टीत २५० अंकांची घसरण पाहायला मिळत होती.

जागतिक बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराला घसरणीसह सुरुवात झाली. प्री ओपनिंग सत्रातच निफ्टीत २५० अंकांची घसरण पाहायला मिळत होती. निफ्टी आज २२२ अंकांच्या घसरणीसह २४७९० च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्समधील व्यवहार ७०९ अंकांच्या घसरणीसह सुरू झाले आणि ८११५९ च्या पातळीवर उघडले. 

सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास सर्वच क्षेत्रात विक्रीचे वातावरण दिसून आलं. आज सकाळी आयटी, बँकिंग, ऑईल अँड गॅस क्षेत्रात सर्वाधिक विक्री दिसून आली. निफ्टी २४८०० च्या इमिग्रंट सपोर्ट लेव्हलजवळ ट्रेड करत आहे. २५००० च्या आसपास निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंगचं सत्र होणं स्वाभाविक आहे, परंतु निफ्टीसाठी महत्वाची पातळी म्हणजे २४८०० ची आहे. या ठिकाणी खरेदी झाली नाही आली नाही तर प्रॉफिट बुकिंगची आणखी एक फेरी सुरू होईल. ज्यामुळे निफ्टी २४६०० पर्यंत जाऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

अमेरिकन बाजारातही घसरण

मॅन्युफॅक्चरिंग आणि नोकऱ्यांच्या कमकुवत आकडेवारीमुळे अमेरिकी बाजारांवर काल दबाव आला. दुसरीकडे बँक ऑफ इंग्लंडनं व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रसेल २००० निर्देशांक फेब्रुवारी २०२४ नंतर सर्वाधिक घसरला. सेमीकंडक्टर शेअर्समध्ये २० मार्चनंतर सर्वाधिक घसरण झाली. इंटेलनं १५ टक्के लोकांना कामावरून काढून टाकणार असल्याचीही माहिती दिली. तर दुसरीकडे टोयोटाचा शेअर ८ टक्के तर मॉडर्नाचा शेअर २१ टक्क्यांनी घसरला.

आशियाई शेअर बाजारातही घसरण

आज आशियाई बाजारात चौफेर घसरण दिसून येत आहे. निक्केई १,७८८.५२ अंकांनी म्हणजेच जवळपास ४.७ टक्क्यांनी घसरून ३६,३३३.९३ वर बंद झाला आहे. स्ट्रेट्स टाईम्स ३२.९९ अंकांच्या म्हणजेच ०.९२ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. तर तैवानचा बाजार ७७२.६५ अंकांनी म्हणजेच ३.४५ टक्क्यांनी घसरून २१,८६१.०२ वर बंद झाला आहे. तर हाँगकाँगचा हँगसेंग ३३४.७५ अंकांनी म्हणजेच २ टक्क्यांच्या वाढीसह १६,९६३.८९ वर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजार