Join us

Share Market : शेअर बाजारात जबरदस्त खरेदी; सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला, निफ्टी २१६५० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:50 AM

सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी कामकाजाच्या सुरूवातीला शेअर बाजारातील तेजी दिसून आली.

Stock Market Opening: सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी कामकाजाच्या सुरूवातीला शेअर बाजारातील तेजी दिसून आली. सोमवारी कामकाजाच्या अखेरीस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. मंगळवारी शेअर बाजार उघडला तेव्हा तेजी असलेल्या शेअर्सची संख्या 2200 शेअर्स आणि घसरण दिसून आलेल्या शेअर्सची संख्या फक्त 200 होती.

बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 415.69 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 71,770 वर उघडला. त्याच वेळी, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 140.60 अंकांच्या किंवा 0.65 टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह 21,653 च्या पातळीवर उघडला.

प्री ओपनिंगमध्येही तेजी

शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स 326.72 अंकांच्या वाढीसह 71681 वर व्यवहार करत होता. एनएसईचा निफ्टी 142.50 अंकांनी वाढून 21655 वर व्यवहार करत होता.

जवळपास सर्वच शेअर्समध्ये तेजी

ओपनिंगच्या वेळी, सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एका शेअरमध्ये घसरण दिसून आली आणि तो पॉवर ग्रिडचा आहे. उर्वरित 29 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्सच्या टॉप गेनर्समध्ये आयटी शेअर्सचं वर्चस्व दिसत आहे आणि टॉप 6 पैकी 5 शेअर्स आयटी क्षेत्रातील आहेत. विप्रोच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.

निफ्टीच्या 50 पैकी 48 शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आणि केवळ 2 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बायबॅकच्या बातमीनंतर, बजाज ऑटोचा शेअर 2.81 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो निफ्टीचा टॉप गेनर ठरला.

टॅग्स :शेअर बाजार