Join us  

Share Market Investment: ७५ हजार कोटींची गुंतवणूक! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा शेअर १६२ ₹वर जाणार? तुम्ही घेणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 4:36 PM

टाटा समूहातील ही कंपनी भविष्यात उत्तुंग झेप घेऊ शकेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Share Market Investment: शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यातच टाटा समूहाच्या अनेकविध कंपन्या शेअर बाजारात दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र, काही कंपन्या उच्चांकी स्तरावर जाऊन खाली येताना दिसत आहेत. तर काही कंपन्यांच्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागत असून, पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यापैकी एक कंपनी म्हणजे Tata steel. आताच्या घडीला ही कंपनीचे शेअर लाल रंगात दिसत असले, तरी तज्ज्ञांनी या कंपनीचा शेअर १६१ रुपयांवर जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. 

अलीकडील काळात टाटा स्टीलचा समभाग सलग सत्रांत वाढल्यानंतर उच्चांकावर होता. या कालावधीत स्टॉक जवळपास ९ टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील शेअरच्या घसरणीला ब्रेक लागून तो पुन्हा उसळी घेईल, असा विश्वास काही ब्रोकरेज कंपन्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही, तर काहींनी हा शेअर घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या ५ वर्षांत ७५ हजार कोटींची गुंतवणूक

टाटा स्टीलचे एमडी आणि सीईओ टीव्ही नरेंद्रन यांच्या वक्तव्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली होती. १ डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथील 'मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२२' मध्ये कंपनीने सांगितले होते की, टाटा स्टील भारताच्या एकूण स्टील निर्मिती क्षमतेपैकी २५ टक्के असलेल्या ओडिशामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल. नरेंद्रन म्हणाले की, टाटा समूहाच्या मेटल ब्रांचने गेल्या पाच वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, तज्ज्ञ टाटा स्टीलच्या शेअर्सवर विश्वास ठेवत असून, खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. एन्जेल वनच्या मते, हा स्टॉक ११६-११८ च्या दरम्यान व्यापार करेल. तर टीप्स टू ट्रेडने टाटा स्टीलच्या शेअरची लक्ष्य किंमत १२१ रुपये ठेवली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्टने या शेअरची लक्ष्य किंमत १६२ रुपये ठेवली आहे.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारटाटागुंतवणूक