Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण

Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण

गतसप्ताहामध्ये बाजाराने आधीची घोडदौड कायम राखली नाही. मात्र आगामी सप्ताहात बाजार नरम-गरम राहू शकतो.

By प्रसाद गो.जोशी | Published: June 24, 2024 08:44 AM2024-06-24T08:44:44+5:302024-06-24T08:45:24+5:30

गतसप्ताहामध्ये बाजाराने आधीची घोडदौड कायम राखली नाही. मात्र आगामी सप्ताहात बाजार नरम-गरम राहू शकतो.

Share Market Investment hike over the investors have become cautious due to the completion of the deal, there is selling pressure in the market | Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण

Share Market Investment : घोडदौड संपली, नरमाईने गुंतवणूकदार झाले सावध, सौदापूर्तीमुळे बाजारात विक्रीचे दडपण

गतसप्ताहामध्ये बाजाराने आधीची घोडदौड कायम राखली नाही. मात्र आगामी सप्ताहात बाजार नरम-गरम राहू शकतो. अर्थसंकल्प जवळ येत असून, त्यामुळे साहजिकच काहीशी सावधानता गुंतवणूकदार बाळगून आहेत. याशिवाय जून महिन्याची सौदापूर्ती होत असल्याने बाजारावर काही प्रमाणात विक्रीचे दडपण राहण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णयांवर बाजाराची प्रतिक्रिया बघायवास मिळेल. अमेरिकेतील बँकांच्या स्ट्रेस सेटच्या निकालाकडे बाजाराचे लक्ष आहे.

परकीय वित्तसंस्थाकडून पुन्हा खरेदी सुरू

परकीय वित्तसंस्था आता भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदीसाठी उतरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच देशांतर्गत वित्तसंस्थाही मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे दिसून आले आहे. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ९१०३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.

त्यांनी या महिन्याचा विचार करता आतापर्यंत १२,१७० कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले आहेत. रोख्यांमध्ये या संस्था पूर्वीपासूनच खरेदी करीत होत्या. गतसप्ताहात यामध्ये १०,५७५ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत.

Web Title: Share Market Investment hike over the investors have become cautious due to the completion of the deal, there is selling pressure in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.