Join us  

Share Market Investment: छप्परफाड रिटर्न! १ लाखाचे झाले ११.८० कोटी; शेअरने पकडला रॉकेट स्पीड, ३₹चा शेअर गेला १२८१₹वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:46 PM

Share Market Investment: एकीकडे शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असताना दुसरीकडे या कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

Share Market Investment: शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहेत. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर सावरताना दिसत नाहीत. शिवाय जागतिक घडामोडींचा परिणामही शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असली तरी अशा काही कंपन्या आहेत ज्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना भन्नाट परतावा देत आहेत. या कंपन्यांचा समावेश मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत केला जातो. 

या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना ११ कोटींहून अधिक परतावा मिळाला. येत्या काळात या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न देणारी कंपनी म्हणजे Jyoti Resins and Adhesives Ltd. या कंपनीने अलीकडेच २:१ च्या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी केले आहेत. बोनस शेअर्समुळेच गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला आहे. गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, या कंपनीचा शेअर ५३५ रुपायंवरून ते १२८१.५० रुपयांपर्यंत वाढला. या शेअर्सने भागधारकांना १४० टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या ५ वर्षांत दिलाय ५६०० टक्क्यांचा दमदार परतावा

गेल्या पाच वर्षांत हा शेअर २२.५५ रुपयांवरुन १२८१.५० रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला आहे. यावेळी ५६०० टक्के परतावा दिला आहे. Jyoti Resins and Adhesives Ltd कंपनीचा मल्टिबॅगर शेअर दशकभरापूर्वी ३.२५ रुपयांवर होता. आता हा स्टॉक १२८१ अंकांवर व्यवहार करत आहे. या काळात हा स्टॉक ३९,३०० टक्क्यांनी वधारला. अशा स्थितीत, जर एखाद्याने या कालावधीत या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला ११.८० कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला असता, असे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक