Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Investment: कमाल! २.२५ ₹चा शेअर गेला ५५४ ₹वर, १ लाखाचे झाले २.४६ कोटी; अजूनही घ्यावा का हा स्टॉक?

Share Market Investment: कमाल! २.२५ ₹चा शेअर गेला ५५४ ₹वर, १ लाखाचे झाले २.४६ कोटी; अजूनही घ्यावा का हा स्टॉक?

Share Market Investment: अलीकडील काळात घसरण होत असलेल्या या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:42 PM2023-01-13T14:42:34+5:302023-01-13T14:43:13+5:30

Share Market Investment: अलीकडील काळात घसरण होत असलेल्या या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.

share market investment multibagger stock sel manufacturing surges 2 rupee to 554 rupees 1 lakh turn into 2 46 crore | Share Market Investment: कमाल! २.२५ ₹चा शेअर गेला ५५४ ₹वर, १ लाखाचे झाले २.४६ कोटी; अजूनही घ्यावा का हा स्टॉक?

Share Market Investment: कमाल! २.२५ ₹चा शेअर गेला ५५४ ₹वर, १ लाखाचे झाले २.४६ कोटी; अजूनही घ्यावा का हा स्टॉक?

Share Market Investment: शेअर मार्केटमध्ये पडझड दिसून येत आहे. शेअर बाजारात गुंवतणूक करायची असेल, तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला किंवा त्यातील अभ्यास खूप महत्त्वाचा मानला जातो. शेअर बाजारातीलगुंतवणूक अतिशय जोखमीची मानली जाते. अलीकडील काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. काही कंपन्या गुंतवणूकदारांवरील विश्वास सार्थ ठरवत उच्च परतावा देत आहे. मल्टिगबॅगर यादीत समावेश असलेल्या SEL कंपनीने गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न्स देत मालामाल केले आहे. 

SEL कंपनीचा शेअर एकेकाळी राष्ट्रीय निर्देशांकात १९७५.८० रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहे. असे असले तरी कंपनीचा शेअर सावरत असून, आताच्या घडीला ५५४.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. १५ जानेवारी २०२१ पर्यंत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक NSE वर २.२५ रुपये प्रति शेअर व्यवहार करत होता. आताच्या घडीला हा शेअर ₹५५४ रुपयांवर व्यवहार करत आहे. या पेनी स्टॉकने गेल्या दोन वर्षांत २४,५०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 

२.२५ ₹चा शेअर गेला ५५४ ₹वर, १ लाखाचे झाले २.४६ कोटी

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते आणि गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्या १ लाखाचे ८.५० लाख रुपये झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाखाची गुंतवणूक केली असेल, तर  १ लाख रुपयांचे २.४६ कोटी रुपये झाले असते. हा स्टॉक बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, हा मल्टिबॅगर स्टॉक गेल्या सहा महिन्यांत सुमारे ₹९२५ वरून ₹५५४ च्या पातळीवर घसरला आहे. तथापि, गेल्या सहा महिन्यांत ४० टक्क्यांहून अधिक घसरण होऊनही, गेल्या एका वर्षात या समभागाने जवळपास ७५० टक्के परतावा दिला आहे, असे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share market investment multibagger stock sel manufacturing surges 2 rupee to 554 rupees 1 lakh turn into 2 46 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.