Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Tips: कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! १ हजार कोटींची ऑर्डर अन् शेअरला अप्पर सर्किट; २० टक्के वाढ!

Share Market Tips: कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! १ हजार कोटींची ऑर्डर अन् शेअरला अप्पर सर्किट; २० टक्के वाढ!

Share Market: एका मोठ्या ऑर्डरमुळे या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची दिवाळी केली. तुम्ही घेतलाय का शेअर? जाणून घ्या, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:50 AM2022-10-12T11:50:25+5:302022-10-12T11:50:59+5:30

Share Market: एका मोठ्या ऑर्डरमुळे या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची दिवाळी केली. तुम्ही घेतलाय का शेअर? जाणून घ्या, डिटेल्स...

share market investment panacea biotec hits upper circuit after winning rs 1000 crore order know all details | Share Market Tips: कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! १ हजार कोटींची ऑर्डर अन् शेअरला अप्पर सर्किट; २० टक्के वाढ!

Share Market Tips: कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! १ हजार कोटींची ऑर्डर अन् शेअरला अप्पर सर्किट; २० टक्के वाढ!

Share Market Tips: गेल्या अनेक आठवड्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराच्या अनिश्चिततेचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे काही कंपन्या आपल्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतणूकदारांना मेगा रिटर्न्स देताना दिसत आहेत. अशीच एक कंपनी आहे, ज्या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाल्याचे वृत्त समजताच या कंपनीचे शेअर्स एका दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढले असून, यामुळे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत. 

शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच बायोटेक्नॉलॉजी कंपनीतील पॅनासिया बायोटेकच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. दिवसभरात कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वाढला. शेअरची किंमत १६१ रुपयांपर्यंत पोहोचली. आताच्या या घडीला या कंपनीचा शेअर १५८.५५ रुपयांवर आहे. एकाच दिवसात कंपनीचा शेअर २४.५५ रुपयांनी वाढला. 

कंपनीच्या शेअरने पकडला रॉकेट स्पीड 

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. याची माहिती गुंतवणूकदारांना समजताच या कंपनीच्या शेअरनं रॉकेट स्पीड पकडला. पॅनासिया बायोटेक कंपनी लस, डायबेटिज, ट्रान्सप्लान्ट, गॅस्ट्रो आणि ऑन्कोलॉजीसह अन्य औषधांची निर्मिती करते. कंपनीला युनिसेफकडून ९८.७५ मिलियन डॉलर (८१३ कोटी रुपये) आणि पाहोकडून २८.५५ मिलियन डॉलर (२३५ कोटी रुपये) इतक्या किमतीची ऑर्डर मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्धासह अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसत आहे. आयटी आणि मेटल सेक्टरमधील कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share market investment panacea biotec hits upper circuit after winning rs 1000 crore order know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.