Share Market Investment : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी योग्य स्टॉकची निवड करणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्या स्टॉकला दीर्घ काळासाठी होल्ड करणं महत्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला R & B Denims कंपनीच्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने काही वर्षातच गुंतवणूकदारांना मालामाल केलं. 2016 जानेवारी महिन्यात कंपनीच्या एका शेअरचा भाव फक्त 2.25 रुपये होता.
शेअर विभाजनाचा कसा परिणाम झाला?
R & B Denims एक स्मॉल कॅप कंपनी आहे. कंपनीचा मार्केट कॅप 272 कोटी रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने जानेवारी 2016 मध्ये कंपनीचे शेअर खरेदी केले असते, तर त्याला फक्त 2.25 रुपयांना शेअर अलॉट झाले असते. ऑक्टोबर 2021 मध्ये R & B Denims चा एक शेअर 5 भागांमध्ये विभागला गेला. म्हणजे, एखाद्या गुंतवणूकदारकडे जितके शेअर होते, त्याला त्या शेअरच्या मोबदल्यात पाचपट शेअर मिळाले असते.
दीर्घकालीन गुंतवणूकदार मालामाल
दरम्यान, 7 वर्षांपूर्वी R & B Denims मध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला 44,444 शेअर अलॉट झाले असतील. पण, ऑक्टोबर 2021 मध्ये स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर त्या शेअर्सची संख्या 2,22,220 झाली. सध्या R & B Denims च्या एका शेअरचा भाव 39 रुपये बीएसईमध्ये आहे. या हिशोबाने पाहिल्यास, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची गुंतवणूक आताच्या काळात 87 लाख रुपये झाली असती.