Join us  

Share Market Investment: १२० ₹वर जाणार ‘या’ कंपनीचा शेअर! गुंतवणूकदारांचे नववर्ष ‘गोड’ होणार; घ्यावा की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 11:52 AM

Share Market Investment: सन २०२३ मध्ये या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर स्टॉकच्या यादीत येऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

Share Market Investment: कोरोनाचे पुन्हा घोंघावणारे संकट, जागतिक पातळीवर असलेली मंदीच्या लाटेची शक्यता आणि अन्य कारणांचा भारतीय शेअर मार्केटवर होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही सत्रांमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरी काही कंपन्यांवर गुंतवणूकदार विश्वास दर्शवत असून, गुंतवणूक करत आहेत. 

श्रीरेणुका शुगर्सचे शेअर्स या कंपनीने चांगली कामगिरी करून दाखवत, एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले. कंपनी याही वर्षात कामगिरीतील सातत्य ठेवत, नवीन वर्षातही जबरदस्त परतावा देऊ शकतात. या कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला शेअर बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. 

गेल्या एका वर्षात ९१.६८ टक्के परतावा

श्रीरेणुका शुगर्सचे शेअर्स किरकोळ घसरणीसह ५७.८० रुपयांवर व्यवहार करत होते. या समभागाने गेल्या एका आठवड्यात सुमारे ५.५० टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या एका वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना ९१.६८ टक्के परतावा दिला. गेल्या ३ वर्षांत ५२२ टक्के मल्टिबॅगर परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ६८.७५ रुपये आहे आणि नीचांकी स्तर २९.८० रुपये आहे.

दरम्यान, IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता (कमोडिटी आणि चलन) यांनी श्रीरेणुका शुगर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ३४ रुपयांच्या स्टॉप लॉससह आणि १२० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक २०२३ चा मल्टिबॅगर स्टॉक बनू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक