Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Share Market Investment: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय?

Multibagger Share Market Investment: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय?

Multibagger Share Market Investment: फक्त ४ रुपयांवर असलेला शेअर २२०० रुपयांजवळ गेल्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत बनल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 02:51 PM2023-01-31T14:51:39+5:302023-01-31T14:52:37+5:30

Multibagger Share Market Investment: फक्त ४ रुपयांवर असलेला शेअर २२०० रुपयांजवळ गेल्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत बनल्याचे सांगितले जात आहे.

share market investment srf chemical multibagger stocks declared 4 1 ratio bonus share 1 lakh investment turn into 24 50 crore | Multibagger Share Market Investment: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय?

Multibagger Share Market Investment: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय?

Multibagger Share Market Investment: अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत दिलेला अहवाल, जागतिक स्तरावरील मंदीचे ढग, विविध कंपन्यांतील नोकरकपात याचा नकारात्मक परिणाम देशातील शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी ६३ हजारांवर असलेला शेअर मार्केटचा निर्देशांक ६० हजारांच्या खाली आला आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मात्र, यातच आता एका कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या कंपनीने एका शेअरवर ४ शेअर बोनस दिले असून, गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे २४ कोटी झाल्याचे सांगितले जात आहे. 

SRF कंपनीचा शेअर हा भारतीय शेअर बाजारातील मल्टिबॅगर स्टॉकपैकी एक आहे. केमिकल क्षेत्रातील या कंपनीने भागधारकांना नियमित लाभांश आणि बोनस शेअर दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या निव्वळ परताव्यात वाढ झाली आहे. केमिकल कंपनीने ४:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली होती. प्रत्येक शेअर्ससाठी चार बोनस शेअर्स देण्यात आले होते. यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीशिवाय शेअरहोल्डिंगमध्ये ४०० टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. या बोनस शेअरमुळे एखाद्या गुंतवणूकदाराने २० वर्षांपूर्वी या केमिकल कंपनीत १ लाख गुंतवले असते, तर त्या १ लाख रुपयांचे आताच्या घडीला २४.५० कोटी रुपये झाले असते, असे सांगितले जात आहे. 

कंपनीने गेल्या पाच वर्षांत दिला तब्बल ५०० टक्क्यांहून अधिक परतावा 

एसआरएफ या केमिकल कंपनीने गेल्या पाच वर्षांत ५०० टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गेल्या दहा वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक या काळात सुमारे ३९ रुपयांवरून थेट २,२०० रुपयांच्या पातळीवर गेला. तर दुसरीकडे, गेल्या २० वर्षांत या कंपनीचा शेअर ४.५० रुपयांवरुन २,२०० रुपयांवर पोहोचला. 

दरम्यान, जर एखाद्या गुंतवणूकदाराने २० वर्षांपूर्वी या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि आजही गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याला प्रति शेअर ४.५० रुपयांप्रमाणे अंदाजे २२,२२२ SRF शेअर्स मिळाले असते. कंपनीने ४:१ बोनस शेअर्स जारी केल्यानंतर हे शेअर्स १,११,११० पर्यंत वाढले असते. म्हणजेच आताच्या घडीला SRF शेअरची किंमत २,२०० रुपये असल्याने १ लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य २४.५० कोटी झाले असते, असे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share market investment srf chemical multibagger stocks declared 4 1 ratio bonus share 1 lakh investment turn into 24 50 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.