Join us

Share Market Investment: ९०० ₹वर जाणार TATA समूहातील ‘या’ कंपनीचा शेअर; २५० टक्के दिलेय रिटर्न, घ्यावा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 5:34 PM

Share Market Investment: टाटा समूहातील ही कंपनी दमदार कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना मालामाल करत असल्याचे सांगितले जात आहे.

Share Market Investment: आताच्या घडीला शेअर बाजाराचा निर्देशांक ६२ हजार अंकांवर आहे. शेअर बाजारातील अनेक कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. विविध क्षेत्रातील TATA समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यापैकी एका कंपनीचा शेअर ९०० रुपयांवर जाऊ शकेल, असा कयास बांधला जात आहे. आताच्या घडीला हा शेअर ८०३ रुपयांवर आहे. 

टाटा समूहातील या कंपनीचे नाव आहे टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (Tata Consumer Products). ग्लोबल ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनली यांनी टाटाच्या या कंपनीचा शेअर ९०० रुपयांवर जाऊ शकेल, असा अंदाज वर्तवला आहे. आताच्या घडीला या शेअरची किंमत ८०० रुपयांवर असली तर भविष्यात हा शेअर ९०० रुपयांवर जाऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजनी याच कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइज ८८८ रुपये ठेवली होती. 

४ वर्षांत २५० टक्क्यांचा परतावा, १ लाखाचे झाले ३.५ लाख

गेल्या ४ वर्षांत टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीच्या शेअरने २५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी या शेअरची किंमत २१८.६५ रुपयांवर होती. ४ वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आता ३.५ लाख रुपये झाली असती. दुसरीकडे, ३ वर्षांपूर्वी एखाद्याने एक लाख रुपये गुंतवले असते, तर या शेअरमधून २.५७ लाखांचा परतावा मिळाला असता. 

दरम्यान, Tata Consumer Products ही जगातील सर्वांत मोठी FMCG कंपनी आहे. देशात मीठ, डाळी, मसाले आणि अन्य खाद्यपदार्थांची विक्री करते. याशिवाय या कंपनीचा यूके, यूएस, कॅनडा आणि इतर काही देशांमध्ये चहा, कॉफी आणि अन्य पेयांमध्ये तगडा पोर्टफोलिओ आहे. त्याची उपकंपनी पॅकेज्ड वॉटर आणि इतर शीतपेयांमध्ये NourishCo आहे. तर, कंपनीचा Starbucks सोबत संयुक्त उपक्रम आहे आणि भारतात 275 स्टोअर्स आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूक