Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Investment Tips: बंपर रिटर्न! ४₹चा शेअर गेला ७७५₹वर; ६३ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार बनले श्रीमंत

Share Market Investment Tips: बंपर रिटर्न! ४₹चा शेअर गेला ७७५₹वर; ६३ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार बनले श्रीमंत

Share Market Investment Tips: शेअर मार्केटमधील एका कंपनीने गुंतवणूकदारांची दिवाळी केली असून, गेल्या सहा महिन्यात ४६ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:56 PM2022-11-16T15:56:27+5:302022-11-16T15:57:23+5:30

Share Market Investment Tips: शेअर मार्केटमधील एका कंपनीने गुंतवणूकदारांची दिवाळी केली असून, गेल्या सहा महिन्यात ४६ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

share market investment tips multibagger share caplin point laboratories ltd 4 rupees share goes up to 775 rs investors become crorepati | Share Market Investment Tips: बंपर रिटर्न! ४₹चा शेअर गेला ७७५₹वर; ६३ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार बनले श्रीमंत

Share Market Investment Tips: बंपर रिटर्न! ४₹चा शेअर गेला ७७५₹वर; ६३ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार बनले श्रीमंत

Share Market Investment Tips: शेअर मार्केटमध्ये आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. शेअर निर्देशांक नव्या विक्रमाकडे वाटचाल करत आहे. यातच अनेकविध कंपन्यांचे आयपीओही येत आहेत. असे असले तरी काही लिस्टेट कंपन्या चांगली कामगिरी करत असून, अवघ्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना तगडा परतावा देताना पाहायला मिळत आहे. यात एका कंपनीचा केवळ ४ रुपयांवर असलेला शेअर ७७५ रुपयांवर केला असून, गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

गुंतवणूकदारांना श्रीमंत करणाऱ्या कंपनीचे नाव कॅपलिन पॉइंट लेबॉरेटरिज (Caplin Point Laboratories) असून, गेल्या ११ वर्षांत कंपनीने कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना भन्नाट परतावा दिला आहे. कॅपलिन पॉइंट लेबॉरेटरिज ही पूर्णपणे इंटिग्रेटेड फार्मा कंपनी असून, अमेरिका आणि आफ्रिका देशांमध्ये या कंपनीचा मोठा दबदबा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच युरोपीय देशांमध्येही या कंपनीचा विस्तार तेजीने होत आहे. यात कंपनीने चांगला व्यवसाय करत मोठा नफा कमावला आहे. 

६३ हजारांचे झाले १ कोटी, गुंतवणूकदार बनले श्रीमंत!

मिळालेल्या माहितीनुसार, कॅपलिनचा शेअर ११ नोव्हेंबर २०११ रोजी ४.८६ रुपयांवर होता, जो १४ नोव्हेंबर २०२२ ला ७७५.३५ रुपयांवर पोहोचला. अवघ्या ११ वर्षांत कंपनीचा शेअर जवळपास १५,८५० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. ११ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये कोणी फक्त ६३ हजार रुपये गुंतवले असते आणि शेअर तसाच ठेवला असता तर आताच्या घडीला त्याची किंमत १ कोटी रुपयांहून अधिक झाली असती. गेल्या ६ महिन्यांचा विचार केल्यास या कंपनीच्या स्टॉकने सुमारे ४६ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये मल्टिबॅगर कॅटेगरीत येणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. तरीदेखील कोणत्याही कंपनी शेअर खरेदी करण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच विचापूर्वक केलेली दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: share market investment tips multibagger share caplin point laboratories ltd 4 rupees share goes up to 775 rs investors become crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.