Join us

Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 8:37 AM

Rekha Jhunjhunwala Titan Share Price: गेल्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. अनेक मोठ्या शेअर्सनाही बाजारातील या चढ-उताराचा फटका बसला.

Rekha Jhunjhunwala Titan Share Price: गेल्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. टायटनसह अनेक मोठ्या शेअर्सनाही बाजारातील या चढ-उताराचा फटका बसला. दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्येही टायटनचा समावेश आहे. ही टाटा समूहाची कंपनी असून या शेअरमध्ये महिन्याभरात सुमारे ४९७ रुपयांची घसरण झाली. केवळ एका शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये २३०० कोटींहून अधिक घट झाली. टायटनमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचीही (एलआयसी) गुंतवणूक असून त्यांच्याही नेटवर्थमध्ये ७७२ कोटी रुपयांची घट झाली आहे. 

रेखा झुनझुनवालांचा किती हिस्सा? 

३१ मार्च २०२४ पर्यंत रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्याकडे टायटन कंपनीत ५.३५ टक्के हिस्सा होता. चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून या शेअरवर विक्रीचा दबाव आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ७ टक्के वाढ झाली असून ती ७३४ कोटींवरून ७८६ कोटींवर गेली आहे. तिमाहीचा महसूल १७ टक्क्यांनी वाढून १०,०४७ कोटी रुपये झाला आहे. विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या किंमतीतील चढउतार आणि वाढत्या स्पर्धेचा टायटनवर परिणाम होऊ शकतो. टायटनच्या दीर्घकालीन कामगिरीबाबत आशावादी असल्याचं मत अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं व्यक्त केलंय. तसंच हा एक मजबूत ब्रँड असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

आठवड्याभरात किती नुकसान? 

एनएसईवर टायटनच्या शेअरची किंमत ३,७४९ रुपयांवरून ३,२५२ रुपयांवर आली आहे. आठवडाभरात त्यात ४९७ रुपयांची घसरण झाली. एलआयसीकडे टायटनचे १,५७,७३,१६१ शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या १.७८ टक्के आहेत. टायटनच्या शेअरच्या किंमतीत घट झाल्यानं एलआयसीच्या नेटवर्थमध्ये जवळपास ७८४ कोटी रुपयांची घट झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक