Lokmat Money >शेअर बाजार > 75 टक्क्यांनी वधारला हा सरकारी शेअर; कंपनीच्या लॅपटॉप, कंप्यूटरची बाजारात धूम!

75 टक्क्यांनी वधारला हा सरकारी शेअर; कंपनीच्या लॅपटॉप, कंप्यूटरची बाजारात धूम!

...यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:24 AM2023-09-28T00:24:44+5:302023-09-28T00:26:41+5:30

...यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसत आहे.

Share market iti shares increased by 75 percent in a month The company introduced laptop and micro pc | 75 टक्क्यांनी वधारला हा सरकारी शेअर; कंपनीच्या लॅपटॉप, कंप्यूटरची बाजारात धूम!

75 टक्क्यांनी वधारला हा सरकारी शेअर; कंपनीच्या लॅपटॉप, कंप्यूटरची बाजारात धूम!

सरकारी कंपनी आयटीआय लिमिटेडच्या (ITI Limited) शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर बुधवारी 7 टक्क्यांच्या तेजीसह 206.35 रुपयांवर बंद झाला. दिवसाच्या कामकाजादरम्यान आयटीआयचा शेअर 209.50 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने नुकतेच SMAASH ब्रँड नावाने लॅपटॉप आणि मायक्रो पर्सनल कंप्यूटर (PC) आणले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसत आहे.

एकाच महिन्यात 75 टक्क्यांहून अधिकची तेजी - 
आयटीआय लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात 75.10 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर 28 ऑगस्ट 2023 रोजी 117.85 रुपयांवर होता. तो 27 सप्टेंबर 2023 रोजी 206.35 रुपयांवर पोहोचला. गेल्या 6 महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये 137 टक्क्यांची तेजी आली आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरने 95 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 213.30 रुपये एवढा आहे. ते निचांक 86.50 रुपये एवढा आहे.

बाजारात आणले आहेत लॅपटॉप आणि मायक्रो PC - 
आयटीआय लिमिटेडने इंटेल कॉरपोरेशनच्या साथीने लॅपटॉप आणि मायक्रो पीसी डिझाइन केले आहेत. कंपनीचे पर्सनल कंप्यूटर i3, i5 आणि i7 सारख्या व्हेरिअन्ट्समध्ये आहेत. कंपनी, सोलार सॉल्यूशन्ससोबतच पर्सनल कंप्यूटर ऑफर करते. कंपनीने नुकतेच केरळ इंफ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनकडून (KITE) 2 टेंडर मिळवले आहेत. याअंतर्गत कंपनीला केरळच्या सरकारी शाळांमध्ये जवळपास 9000 लॅपटॉप पुरवायचे आहेत. महत्वाचे म्हणजे, आयटीआयने ऐसर, एचपी, डेल आणि लिनोव्हो सारख्या मल्टीनॅशनल ब्रँड्सना टक्कर देत अनेक टेंडर मिळवले आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market iti shares increased by 75 percent in a month The company introduced laptop and micro pc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.