Join us  

हा ₹20 चा पॉवर शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, LIC चाही कंपनीत मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:42 PM

फेब्रुवरी 2024 मध्ये या शेअरची किंमत 23.99 रुपयांवर होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर नीचांक 8.37 रुपये एवढा आहे. हा भाव ऑक्टोबर 2023 मध्ये होता.

शेअर बाजारात बुधवारी पॉवर सेक्टरशीसंबंधित कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचा शेअर खरेदी करण्यासाटी लोकांची झुंबड उडाली होती. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी हा शेयर 20.03 रुपयांच्या गेल्या क्लोजिंगच्या तुलनेत 15% ने वधारत 22.79 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 10.58% ने वधारून 22.15 रुपयांपर्यंत पोहोचला. फेब्रुवरी 2024 मध्ये या शेअरची किंमत 23.99 रुपयांवर होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर नीचांक 8.37 रुपये एवढा आहे. हा भाव ऑक्टोबर 2023 मध्ये होता.

शेअरहोल्डिंग पॅटर्नचे डिटेल -जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, प्रमोटर्सकडे 24 टक्के वाटा आहे. तर पब्लिक शेयरहोल्डिंग 76 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, पब्लिक शेअरहोल्डरमध्ये ICICI बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक-मुंबईचा समावेस आहे. या शिवाय, एलआयसी कडे 9,44,80,125 शेअर्स अथवा 1.38 टक्के एवढा वाटा आहे.

तिमाही निकाल असे -जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सच्या जून तिमाहीच्या निकालाचा विचा करता, नेट प्रॉफिट 81.86% ने वाढून 348.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा प्रॉफिट 191.65 कोटी रुपये होता. कंपनीच्या सेल्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, तो 2.75% वाढून 1754.70 कोटी रुपये होता. तर एक वर्षापूर्वी याच तिमाहीत हा सेल 1707.82 कोटी रुपये होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक