Join us

झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या शेअरची कमाल, 6 महिन्यांत पैसा डबल; गुंतवणूकदार मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 5:24 PM

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांच्या मते, कंपनीचे शेअर्स आगामी काळात 200 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी 190 ते 200 रुपये टार्गेट ठेवले आहे.

चालू आर्थिक वर्षात डीबी रियल्टीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मार्च 2023 मध्ये कंपनीचा शेअर 60 रुपयांवर पोहोचला होता. तर आज कंपनीचा शेअर एनएसईवर 182.50 रुपयांवर आहे. हा कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांकही आहे. डीबी रियल्टीमध्ये रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी गुंतवणूक केली आहे.

200 रुपयांवर पोहोचू शकतो शेअर -चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांच्या मते, कंपनीचे शेअर्स आगामी काळात 200 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी 190 ते 200 रुपये टार्गेट ठेवले आहे. याच वेळी, 165 रुपये प्रति शेअर एवढा स्टॉप लॉसही निश्चित करण्यात आला आहे.

गेल्या एका महिन्याचा विचार करता, डीबी रियल्टीच्या शेअरची किंमत 167.80 वरून 182.50 रुपयांवर पोहोचली. अर्थात, गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवमूक केली होती, त्यांना आतापर्यंत 110 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 

रेखा झुनझुनवालांकडे किती वाटा? - सप्टेंबर क्वार्टरच्या निकालानुसार, या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांचा एकूण 1.99 टक्के एवढा आहे.  (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारराकेश झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक