Join us  

छोट्या शेअरची कमाल! 6 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट; आता कंपनीनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 9:41 PM

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत. ज्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला आहे.

शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स असे आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना झटक्यात कोट्यधीश बनवले. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत. ज्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला आहे. हा शेअर आहे जाँजुआ ओव्हरसीज लिमिटेड (Jonjua Overseas Ltd) चा.

या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल -जाँजुआ ओव्हरसीजच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. गेल्या 6 दिवसांपासून हा शेअर अप्पर सर्किटवर आहेत. आता कंपनीने योग्य गुंतवणूकदारांना 9 बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. हा शेअर गेल्या शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 15.59 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 दिवसांत या शेअरमध्ये 21 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. 

एका महिन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास जोंजुआ ओव्हरसीजच्या शेअरने गेल्या एका महिन्यात 19 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर 6 महिन्यांत हा शअर 65 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. या शेअरमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली ते आता मालामाल झाले आहेत. 

बोनस शेअर -शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत जाँजुआ ओव्हरसीजने (Jonjua Overseas Ltd) म्हटले आहे की, ते 50 शेअरवर 9 बोनस शेअर देणार आहेत. कंपनीने बोनस शेअर्ससाठी 10 ऑक्टोबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. 9 ऑक्टोबरला कंपनीचा शेअर बाजारात एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करेल. महत्वाचे म्हणजे, रेकॉर्ड डेटला ज्या गुंतवणूकदारांकडे 50 शेअर असतील, त्यांना 9 शेअर बोनस स्वरुपात मिळतील.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक