Lokmat Money >शेअर बाजार > ₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव!

₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव!

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23.99 रुपये तर नीचांक 5.95 रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 13473.90 कोटी रुपये एवढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:39 PM2024-07-28T18:39:03+5:302024-07-28T18:39:37+5:30

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23.99 रुपये तर नीचांक 5.95 रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 13473.90 कोटी रुपये एवढे आहे.

Share market jp power share surges 5 percent price increased 230 percent | ₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव!

₹5 च्या पॉवर शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 230% वाढलाय भाव!

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या शुक्रवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 5% पर्यंतची तेजी दिसून आली होती आणि तो 19.75 रुपयांवर बंद झाला होता. महत्वाचे म्हणजे, कंपनीने शनिवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीमध्ये जेपी पॉवरचा निव्वळ नफा 81.86% ने वाढून 348.54 कोटी रुपये झाला आहे. तर जून 2023 मधील याच तिमाहीत तो 191.65 कोटी रुपये एवढा होता.

महसुलातही वाढ - 
जून 2023 ला संपलेल्या तिमाहीतील 1707.82 कोटी रुपयांच्या तुलनेत, जून 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 2.75% ने वाढून 1754.70 कोटी रुपये एवढी झाली. जून तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल 175470 रुपये होता. तर, गेल्या वर्षी याच तिमाहीत हाच महसूल 170782 रुपये एवढा होता.

अशी आहे शेअरची स्थिती - 
जेपी पॉवरचा शेअर गेल्या पाच दिवसांत 11% ने वधारला आहेत. या वर्षात YTD मध्ये हा शेअर 35% ने वधारला आहे. एका वर्षात हा शेअर 230% आणि पाच वर्षांत 935% पर्यंत वाढला आहे. वर्षभरापूर्वी हा शेअर 5 रुपयांवर होता. महत्वाचे म्हणजे, हा शेअर दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. 2008 पासून ते आत्तापर्यंत हा शेअर 123 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत घसरला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23.99 रुपये तर नीचांक 5.95 रुपये एवढा आहे. तर कंपनीचे मार्केट कॅप 13473.90 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market jp power share surges 5 percent price increased 230 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.