शेअर बाजारात केफिन टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये शुक्रवारी 9 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली होती. कंपनीचाशेअर घसरून 483 रुपयांवर आला होता. मात्र काही वेळानंतर यात रिकव्हरीही दिसून आली. यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव 514.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचून बंद झाला. प्रमोटरकडून शेअरची विक्री हे केफिन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये आलेल्या या घसरणीचे कारण आहे.
किती शेअर्स विकले गेले? -जनरन अॅटलांटिक सिंगापूर फंड पीटीईने ओपन मार्केटच्या माध्यमाने शेअर्सची विक्री केली आहे. प्रमोटरने 1,70,00,000 शेअर अर्थात जवळपास 9.98 टक्के हिस्सेदारी कमी केली आहे. प्रमोटरने 500.50 रुपयांनुसार, हे शेअर विकले आहेत. या ट्रांझॅक्शनची एकूण किंमत 850.85 कोटी रुपये एवढी आहे. या विक्रीनंतर, जनरल अॅटलांटिक्सची शेअर होल्डिंग 49.12 टक्क्यांवरून 39.14 टक्क्यांवर आली आहे.
गुंतवणूकदारांसाठी कसं राहिलं हे वर्ष - कंपनीचा 52 आठवड्यांतील नीचांक 271.05 रुपये (29 मार्च 2023) आहे. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 85 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, केफिन टेक्नोलॉजीजच्या शेअरच्या किंमतीती 40 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तसेच, 2023 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 44 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)