Lokmat Money >शेअर बाजार > LIC च्या शेअरमध्ये ऐतिहासिक तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; असा आहे फ्यूचर प्लॅन

LIC च्या शेअरमध्ये ऐतिहासिक तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; असा आहे फ्यूचर प्लॅन

महत्वाचे म्हणजे, LIC चा आयपीओ मे 2022 मध्ये लॉन्च झाला होता. 17 मे 2022 पासून अर्थात लिस्टिंग पासूनच हा शेअर  घसरणीवर आहे. 23 मार्च 2023 ला हा शेअर 530.05 रुपयांपर्यंत घसरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:00 PM2023-11-24T18:00:36+5:302023-11-24T18:01:04+5:30

महत्वाचे म्हणजे, LIC चा आयपीओ मे 2022 मध्ये लॉन्च झाला होता. 17 मे 2022 पासून अर्थात लिस्टिंग पासूनच हा शेअर  घसरणीवर आहे. 23 मार्च 2023 ला हा शेअर 530.05 रुपयांपर्यंत घसरला आहे. 

Share market lic shares jump 10 percent to record best in a day rush to buy | LIC च्या शेअरमध्ये ऐतिहासिक तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; असा आहे फ्यूचर प्लॅन

LIC च्या शेअरमध्ये ऐतिहासिक तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; असा आहे फ्यूचर प्लॅन

बाजारात मंदी असतानाच विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) शेअर्समध्ये शुक्रवारी ऐतिहासिक वाढ झाली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, LIC चा शेअरने लिस्टिंगनंतर, एक दिवसांतील सर्वश्रेष्ठ वाढ नोंदवत 10 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. LIC चा शेअर ट्रेडिंग दरम्यान 681.80 रुपयांपर्यंत पोहोचला. क्लोजिंगला शेअरची किंमत 677.65 रुपये होती. याचे मार्केट कॅप  4,28,613.47 कोटी रुपये एवढे आहे. मात्र, हा शेअर 949 रुपयां इश्यू प्राइसच्या 44% डिस्काउंटवर व्यवहार करत आहे.

महत्वाचे म्हणजे, LIC चा आयपीओ मे 2022 मध्ये लॉन्च झाला होता. 17 मे 2022 पासून अर्थात लिस्टिंग पासूनच हा शेअर  घसरणीवर आहे. 23 मार्च 2023 ला हा शेअर 530.05 रुपयांपर्यंत घसरला आहे. 

4 प्रोडक्ट होणार लॉन्च -
LIC ने चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नव्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये डबल डिजिट ग्रोथ मिळविण्यासंदर्भात योजना आखली आहे. या अनुषंगाने येणाऱ्या काही महिन्यांत तीन ते चार नवे प्रोडक्ट्स लॉन्च करण्याची योजना आहे. एलआयसीचे चेअरमन सिद्धार्थ मोहंती यानी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कंपनी नवी सर्व्हिस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. बाजारात हिला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

काय असेल वैशिष्ट्य - 
या नव्या सर्व्हिसची काही वैशिष्टे सांगताना मोहंती म्हणाले, ही सर्व्हिस निश्चित परतावा प्रदान करेल आणि पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आयुष्यभर विमा किंमतीच्या 10 टक्के मिळत जातील. याशिवाय, कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढण्यासारखी सुविधा, या नव्या सर्व्हिसची वैशिष्ट्ये आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Share market lic shares jump 10 percent to record best in a day rush to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.