Join us  

Share Market Live on Result Day: शेअर बाजारात कोरोनानंतरची सर्वात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 3:51 PM

Share Market Live on Result Day: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठे चढउतार दिसून आले. ही घसरण गेल्या ४ वर्षात एका दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण आहे.

Share Market Live on Result Day: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजप आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठे चढउतार दिसून आले. ही घसरण गेल्या ४ वर्षांत एका दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी मार्च २०२० मध्ये कोरोना काळात अशाच प्रकारे शेअर बाजार मोठ्या प्रमाणात आपटला होता. 

मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठे चढउतार दिसून आले. कामकाजादरम्यान एक अशी वेळ होती जेव्हा सेन्सेक्स ६००० अंकांपेक्षा अधिक अंकांनी घरसला होता. पण कामकाजाच्या अखेरिस सेन्सेक्स ४३८९ अंकांनी घसरून ७२०७९ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टीतही मोठी घसरण दिसून आली. निफ्टी १३७९.४० अंकांनी घसरून २१,८८४.५० अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ४५ लाख कोटी रुपये बुडाले. 

कोण टॉप गेनर्स / लुझर्स 

मंगळवारी हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, हीरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, टाटा कन्झ्युमर, सिप्ला आणि टीसीएसचे शेअर्स सर्वाधिक घसरले, तर अदानी पोर्ट्स २१ टक्के, अदानी एंटरप्रायझेस २० टक्के, ओएनजीसी १७ टक्के, एनटीपीसी १५ टक्के, एसबीआय १४ टक्के, कोल इंडियाचे शेअर्स १४ टक्के तर लार्सन अँड टुब्रोचे समभाग १३ टक्क्यांनी घसरले. 

बँक निफ्टी जोरदार घसरला 

बँक निफ्टी निर्देशांकात दिवसभराच्या कामकाजात मोठी घसरण नोंदविण्यात आली. दुपारी १२ वाजता बँक निफ्टी निर्देशांक ४६०७० अंकांच्या नीचांकी पातळीवर दिसला. मंगळवारी पीएसयू, रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. भेलचे शेअर्स २१ टक्क्यांनी घसरले, तर कंटेनर कॉर्पोरेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बीईएमएल लिमिटेड, टिटागड रेलचे शेअर्स जवळपास २० टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजारकोरोना वायरस बातम्यालोकसभा निवडणूक २०२४ निकाल