Join us

Share Market Live : शेअर बाजारात विक्रमी तेजी, सेन्सेक्स ७३ हजार आणि निफ्टी २२ हजारांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:51 AM

नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची रेकॉर्डब्रेक सुरुवात झाली.

Share Market Live today 15 January 2024: नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची रेकॉर्डब्रेक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स प्रथमच 73000 च्या वर उघडला. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 481 अंकांच्या उसळीसह 73049 च्या पातळीवर उघडला. तर, एनएसई निफ्टी 158 अंकांच्या बंपर वाढीसह 22053 वर उघडला. बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लवकरच निफ्टी 22400 चा स्तर गाठू शकेल.

कामकाजाच्या सुरुवातीला विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस या आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. 611 अंकांच्या बंपर उसळीसह सेन्सेक्सनं 73180 चा स्तर गाठला होता. निफ्टीनेही 167 अंकांच्या उसळीसह 22061 ची पातळी गाठली होती.

शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात इतिहास रचला आहे. एनएसई निफ्टी 21928 च्या आतापार्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता आणि बीएसई सेन्सेक्सनं 72720 चा सार्वकालिक उच्चांक गाठला. या आठवड्यात एचडीएफसी बँक, एचयुएल, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि अल्ट्रा टेक सीमेंट सारख्या प्रमुख कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करतील. याचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे. 

टॅग्स :शेअर बाजार