Stock Market Open Today: कामकाजाच्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 220 अंकांच्या घसरणीसह 73,170 अंकांच्या पातळीवर होता, तर निफ्टी 22 अंकांच्या घसरणीसह 22075 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक मध्ये किंचित वाढ नोंदवली गेली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर ओएनजीसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यासोबतच बजाज फायनान्स, हिंदाल्को आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. एचडीएफसी लाइफचे शेअर्सही घसरणीसह ट्रेड करत होते.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात जिओ फायनान्शियल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर पेटीएम, इरेडा, अश्निषा इंडस्ट्रीज आणि ब्रँड कॉन्सेप्टच्या शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी यांच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली.