Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Live : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला; १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

Share Market Live : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला; १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:59 AM2024-01-17T09:59:11+5:302024-01-17T09:59:21+5:30

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला.

Share Market Live stock market Sensex down by 900 points 2 lakh crores lost by investors in 15 minutes | Share Market Live : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला; १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

Share Market Live : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला; १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला. शेअर बाजारातील या जबरदस्त घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 15 मिनिटांत 2 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. जागतिक शेअर बाजारातून आलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे बुधवारी भारताचा बेंचमार्क इक्विटी इंडेक्स मोठ्या घसरणीसह उघडला.

बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या कामकाजादरम्यान 960 अंकांच्या घसरणीसह उघडला होता. तर निफ्टी 250 अंकांच्या घसरणीसह उघडला. शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचं मार्केट कॅप 1.91 लाख कोटी रुपयांनी घसरून 373 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये निफ्टी मिड कॅप 100 निर्देशांक 0.61 टक्क्यांनी घसरून ट्रेड करत होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.08 टक्क्यांनी खाली आला होता. निफ्टी आयटी निर्देशांकात 0.25 टक्क्यांची वाढ दिसून आली तर, निफ्टी बँक निर्देशांक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात टीसीएस, एचडीएफसी लाइफ, एलटीआय माइंडट्री आणि हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स वाढीसह ट्रेड करत होते. तर एचडीएफसी बँक सुमारे सहा टक्क्यांनी घसरून 1583 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

Read in English

Web Title: Share Market Live stock market Sensex down by 900 points 2 lakh crores lost by investors in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.