बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला. शेअर बाजारातील या जबरदस्त घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 15 मिनिटांत 2 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. जागतिक शेअर बाजारातून आलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे बुधवारी भारताचा बेंचमार्क इक्विटी इंडेक्स मोठ्या घसरणीसह उघडला.
बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या कामकाजादरम्यान 960 अंकांच्या घसरणीसह उघडला होता. तर निफ्टी 250 अंकांच्या घसरणीसह उघडला. शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचं मार्केट कॅप 1.91 लाख कोटी रुपयांनी घसरून 373 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.
बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये निफ्टी मिड कॅप 100 निर्देशांक 0.61 टक्क्यांनी घसरून ट्रेड करत होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.08 टक्क्यांनी खाली आला होता. निफ्टी आयटी निर्देशांकात 0.25 टक्क्यांची वाढ दिसून आली तर, निफ्टी बँक निर्देशांक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात टीसीएस, एचडीएफसी लाइफ, एलटीआय माइंडट्री आणि हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स वाढीसह ट्रेड करत होते. तर एचडीएफसी बँक सुमारे सहा टक्क्यांनी घसरून 1583 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.