Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

Share Market Live Updates 20 Sep: गेल्या २ दिवसांतील शांततेनंतर भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार सुरुवात झाली. अशातच आज शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:00 PM2024-09-20T12:00:28+5:302024-09-20T12:01:35+5:30

Share Market Live Updates 20 Sep: गेल्या २ दिवसांतील शांततेनंतर भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार सुरुवात झाली. अशातच आज शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांक गाठला.

Share Market Live Updates 20 Sep Record bullishness in share market Sensex crosses 84000 for the first time | Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

Share Market Live Updates 20 Sep: गेल्या २ दिवसांतील शांततेनंतर भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा जोरदार सुरुवात झाली. अशातच आज शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं विक्रमी उच्चांक गाठला. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. या तेजीसह सेन्सेक्स ८४२४० च्या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. 

तर दुसरीकडे निफ्टीमध्येही जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी ३०० अंकांच्या तेजीसह २५७२५ अंकांवर पोहोचला. कामकाजादरम्यान जेएसडब्ल्यू स्टील्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया आणि मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

फेडरल बँकेच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम

अमेरिकेतील फेडरल बँकने व्याजदरात ५० बीपीएस कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम झाला. निफ्टीने २५ हजार ६०० च्या वर नवा उच्चांक गाठला. उच्चांकी पातळीवर प्रॉफिट बुकींग दिसली असली तरी बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला.

Web Title: Share Market Live Updates 20 Sep Record bullishness in share market Sensex crosses 84000 for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.