Lokmat Money >शेअर बाजार > झुंझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

झुंझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

या कंपनचा IPO 10 डिसेंबर 2021 रोजी खुला झाला होता. यानंतर कंपनीच्या आयपीओची किंमत 485 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. अर्थात, तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा शेअर 158 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:41 PM2023-10-03T16:41:36+5:302023-10-03T16:44:32+5:30

या कंपनचा IPO 10 डिसेंबर 2021 रोजी खुला झाला होता. यानंतर कंपनीच्या आयपीओची किंमत 485 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. अर्थात, तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा शेअर 158 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 

Share market metro brands share jumps today 14 percent jhunjhunwala have rs 3250 crore shares | झुंझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

झुंझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला, खरेदीसाठी लोकांची झुंबड

रेखा झुंझुनवाला यांची गुंतवणूक असणारी कंपनी मेट्रो ब्रँडच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या कंपनीचा शेअर आज 14 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यातच ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिल्लाधर यांनी मेट्रो ब्रँड्सला 1231 रुपयांचे टार्गेट प्राइस दिली होती. जे कंपनीच्या शेअर्सने मंगळवारी क्रॉस केले आहे. या कंपनीचा IPO 2 वर्षांपूर्वी आला होता.

मेट्रो ब्रँड्सचा शेअर मंगळवारी सकाळी 1126.50 रुपयांवर खुला झाला होता. यानंतर 14.64 टक्क्यांच्या वाढीसह तो 1292 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. हा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. मेट्रो ब्रँड्सचे मार्केट कॅप 33,839.17 कोटी रुपये आहे.

IPO पेक्षा 150% वाढला भाव -
मेट्रो ब्रँड्सचा IPO 10 डिसेंबर 2021 रोजी खुला झाला होता. यानंतर कंपनीच्या आयपीओची किंमत 485 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. अर्थात, तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचा शेअर 158 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 

झुनझुनवालांकडे कंपनीचे किती शेअर? -
रेखा झुनझुनवाला यांचा मेट्रो ब्रँडच्या शेअर्समध्ये मोठा वाटा आहे. मार्च तिमाहीत त्यांची कंपनीतील एकूण हिस्सेदारी 14.40 टक्के एवढी होती. मात्र, जून तिमाहीच्या शेअर होल्डिंगनुसार त्यांची हिस्सेदारी 9.60 टक्क्यांवर आली आहे. सध्या रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडचे 3250 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market metro brands share jumps today 14 percent jhunjhunwala have rs 3250 crore shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.