Lokmat Money >शेअर बाजार > शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी

शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी

आज अर्थात सोमवारी एनएसईमध्ये बीएसईचे शेअर 2134.80 रुपयांच्या पातळीवर ओपन झाले आहेत. मात्र, यांनंतर, काही वेळातच कंपनीचे शेअर 2273.90 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 01:23 PM2023-11-13T13:23:48+5:302023-11-13T13:24:04+5:30

आज अर्थात सोमवारी एनएसईमध्ये बीएसईचे शेअर 2134.80 रुपयांच्या पातळीवर ओपन झाले आहेत. मात्र, यांनंतर, काही वेळातच कंपनीचे शेअर 2273.90 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचले.

Share market money Double in just 6 months Investors made huge purchases on the occasion of Diwali | शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी

शेअरची कमाल...! केवळ 6 महिन्यांत पैसा डबल! दिवालीनिमित्त गुंतवणूकदारांनी केली जबरदस्त खरेदी

 
शेअर बाजारात बीएसई शेअर्सच्या किमतीत गेल्या 6 महिन्यांत 291 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या कालावधीत स्थिर गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 2 पट वाढ झाली आहे. यामुळे आता प्रश्न आहे की, कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल की नाही? तर जाणून घेऊयात तज्ज्ञ यासंदर्भात काय सांगतात? महत्वाचे म्हणजे, रविवारीही मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये 6.18 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

आज अर्थात सोमवारी एनएसईमध्ये बीएसईचे शेअर 2134.80 रुपयांच्या पातळीवर ओपन झाले आहेत. मात्र, यांनंतर, काही वेळातच कंपनीचे शेअर 2273.90 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचले. दुपारी 12 वाजताच्या जवळपास कंपनीचा शेअर 6.40 टक्क्यांच्या तेजीसह 2262.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. 

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी या स्टॉकला ‘न्यूट्रल’ मार्क केले आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रोकरेज हाऊसच्य मते, बीएसईने 1 नोव्हेंबरपासून सेन्सेक्स ऑप्शनवर ट्रांझॅक्शन चार्ज वाढविला आहे. यामुळे रेव्हेन्यूमध्ये वाढ बघायला मिळेल, अशी आशा आहे. महत्वाचे म्हणजे, मोतीलाल ओसवाल यांनी 2250 रुपयांचे टार्गेट प्राइस सेट केले होते. जे आज बीएसई शेअरने क्रॉस केले आहे.

बीएसईचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2273.90 रुपये प्रती शेअर तर नीचांक 406.20 रुपये प्रति शेअर एवढा आहे. कंपनीचा मार्केट कॅप 30,62,280 लाख रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market money Double in just 6 months Investors made huge purchases on the occasion of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.