शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना आल्पावधीतच बम्पर परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे आदित्य व्हिजन लिमिटेडचा. आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
कंपनीचा शेअर 18 जुलै 2022 रोजी 775.75 रुपयांवर होता. तो 18 जुलै 2023 रोजी 1958.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 160 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 2.60 लाख रुपये झाले असते.
आदित्य विजन लिमिटेडने रंका रोड, रंकी मोहल्ला, गढवा- 822114, झारखंडमध्ये 117वे शोरूम सुरू केल्याची घोषणा कंनीने नुकतीच केली होती. 86 हून अधिक स्टोर्स आणि 50 टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सेदारीसह आदित्य विजन बिहारमधील एक मुख्य कंपनी आहे.
कंपनीचा शेअर आज 2,049.70 रुपयांच्या उच्चांकी आणि 1,998.70 रुपयांच्या निचांकी पातळीसह खुला झाला. हा शेअर सध्या 0.14 टक्क्यांनी घसरून 2,006.85 रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2,049.70 रुपये तर निचांक 722 रुपये एवडा आहे.