Lokmat Money >शेअर बाजार > याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! फक्त 40 हजारांचे झाले 10000000; तुम्ही खरेदी केलेत शेअर्स?

याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! फक्त 40 हजारांचे झाले 10000000; तुम्ही खरेदी केलेत शेअर्स?

Share Market Multibagger Stock: अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 05:23 PM2023-04-23T17:23:26+5:302023-04-23T17:23:53+5:30

Share Market Multibagger Stock: अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. जाणून घ्या...

share market multibagger stock auto components equipment schaeffler india share price rocketed made 40 thousand into 1 crore | याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! फक्त 40 हजारांचे झाले 10000000; तुम्ही खरेदी केलेत शेअर्स?

याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! फक्त 40 हजारांचे झाले 10000000; तुम्ही खरेदी केलेत शेअर्स?

Share Market Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावरील अनेक घडामोडींचा प्रभाव आणि परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. काही कंपन्या गुंतवणूकदारांना कंगाल करत आहेत. तर काही कंपन्या मालामाल करून विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच मल्टिबॅगर यादीतील एका कंपनीने दीर्घ मुदतीत गुंतवणूकदांरांना छप्परफाड रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीने दमदार कामगिरी करत मोठी झेप घेतल्याचे म्हटले जात आहे. 

Schaeffler India या ऑटो पार्ट्स निर्मात्या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या मते, सध्याच्या पातळीवर गुंतवणूक केल्यास २२ टक्के कमाई होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. या कंपनीचे शेअर्स BSE वर 2729.90 रुपयांवर व्यवहार करत आहेत. या कंपनीची मार्केट कॅप 42,669.34 कोटी रुपये आहे. कंपनी क्लच सिस्टम, ट्रान्समिशन सिस्टम, टॉर्शन डॅम्पर्स, व्हॉल्व्ह ट्रेन सिस्टम, कॅमशाफ्ट फेजिंग युनिट्स आणि इलेक्ट्रिक ड्राइव्ह तयार करते.

केवळ 40 हजारांच्या गुंतवणुकीवर कोट्यधील बनवले

मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल 2003 रोजी शेफलर इंडियाचे शेअर्स फक्त 10.80 रुपयांवर व्यवहार करत होते. आता तो 25177 टक्क्यांनी वाढून  2729.90 रुपयांवर व्यवहार करत आहे. या कंपनीत तेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती आणि कायम ठेवली असती तर आता 20 वर्षांनी 1 कोटी रुपयांचे भांडवल जमा झाले असते. या कंपनीने कमी कालावधीसाठीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी 25 एप्रिल 2022 रोजी तो 1,921.85 रुपयांवर होता, जो या कंपनीचा एका वर्षातील नीचांकी स्तर ठरला. यानंतर, पुढील पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी 107 टक्क्यांनी झेप घेऊन 15 सप्टेंबर 2022 रोजी 3,968.75 रुपयांचा आकडा गाठला, ही या कंपनच्या शेअर्सची विक्रमी उच्च पातळी ठरली. अवघ्या पाच महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. आताच्या घडीला या कंपनीच्या शेअर्समधील तेजी कमी झाली आहे. 31 टक्क्यांनी या कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: share market multibagger stock auto components equipment schaeffler india share price rocketed made 40 thousand into 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.