शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केले आहे. अनेक वेळा तर, अशा शेअर्सची किंमत एकदा वाढायला सुरुवात झाली, की ते अगदी लोकांच्या आवाक्याबाहेर जातात. अशाच शेअर्सना मल्टी बॅगर शेअर्स देखील म्हटले जाते. शेअर बाजारात असे अनेक मल्टी बॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यापैकीच एक म्हणजे, SRF चा शेअर. SRF च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा मिळून दिला आहे.
शेअरमध्ये तेजी -
SRF Limited ही एक केमिकल सेक्टरशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत तेजी दिसून आली आहे. एके काळी या कंपनीचा शेअर केवळ 2 रुपयांवर होता. 1 जानेवारी 1999 रोजी SRF शेअरची किंमत केवळ 2.06 रुपये एवढी होती. मात्र, आता या शेअरची किंमत 2700 रुपयांवर पोहोचली आहे.
SRF च्या शेअर्सनी 2014 मध्ये 50 रुपयांचा आकडा पार केला. आणि त्याच वर्षांत 150 रुपयांवरही पोहोचला. 2019 मध्ये या शेअरची किंमत 500 रुपये एवढी होती. यानंतर 2020 मध्ये या शेअरने 1000 रुपयांचा आकडा गाठला.
जबरदस्त परतावा -
यानंतर हा शेअर सातत्याने नव-नवे विक्रम करत आहे. 2022 मध्ये हा शेअरस सातत्याने वाढत आहे. SRF ची 52 आढवड्यांतील सर्वाधिक किंमत एनएसईवर 2773.35 रुपये एवढी आहेत. तर 52 आठवड्यांतील सर्वात कमी किंमत 1973.10 रुपये एवढी आहे. सध्या 12 सप्टेंबरला हा शेअर 2725 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच 2 रुपयांवरून 2700 रुपयांवर पोहोचताना या शेअरने जवळपास 1,31,761 टक्के एवढा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)