Lokmat Money >शेअर बाजार > १.५ ₹चा शेअर गेला ३४० ₹वर, ४६ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार मालामाल, छप्परफाड रिटर्न!

१.५ ₹चा शेअर गेला ३४० ₹वर, ४६ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार मालामाल, छप्परफाड रिटर्न!

Multibagger Stocks in Share Market:या कंपनीने गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 02:31 PM2023-06-15T14:31:03+5:302023-06-15T14:33:34+5:30

Multibagger Stocks in Share Market:या कंपनीने गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे.

share market multibagger stocks authum investment and infrastructure share turn 48000 into crores know details | १.५ ₹चा शेअर गेला ३४० ₹वर, ४६ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार मालामाल, छप्परफाड रिटर्न!

१.५ ₹चा शेअर गेला ३४० ₹वर, ४६ हजारांचे झाले १ कोटी; गुंतवणूकदार मालामाल, छप्परफाड रिटर्न!

Multibagger Stocks in Share Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार होताना दिसत आहे. निर्देशांक नवीन विक्रमी पातळीवर जाणार का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. काही कंपन्या गुंतवणूकदारांना धक्क्यावर धक्के देताना पाहायला मिळत आहे. तर काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहेत. मल्टिबॅगर यादीतील एक कंपनी आहे, ज्या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले. 

ऑटम इन्वेस्टमेंट अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. एकेकाळी या कंपनीचा शेअर केवळ दीड रुपयांवर होता. मात्र, लगतच्या सत्रांमध्ये या कंपनीचा शेअर ३४० रुपयांवर व्यवहार करत होता. १८ मार्च २०१९ रोजी या कंपनीचा शेअर १.५५ रुपयांवर व्यवहार करत होता. केवळ चार वर्षांत या कंपनीने रॉकेट स्पीड पकडत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. ज्या गुंतवणूकदारांनी केवळ ४८ हजार रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता त्याची किंमत १ कोटींच्या घरात गेली असती, असे सांगितले जात आहे. 

३ वर्षांत ४३५३ टक्क्यांची वाढ झाली

गेल्या तीन वर्षांत, ऑटम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा स्टॉक ४३५३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. हा मल्टिबॅगर स्टॉक १२ जून २०२० रोजी ७.३२ वर व्यवहार करत होता. तर १२ जून २०२३ रोजी हा शेअर ३२६ रुपयांवर व्यवहार करत होता. आताच्या घडीला या कंपनीच्या शेअरची किंमत ३४० रुपयांवर आहे. या शेअरमध्ये ३ वर्षांपूर्वी एखाद्याने १ लाख रुपये गुंतवले असते तर आज ती रक्कम ४४.५३ लाख रुपये झाली असती, असे सांगितले जात आहे. ऑटम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या समभागांनी दीर्घ आणि अल्प मुदतीच्या दोन्ही कालावधीत जोरदार परतावा दिला आहे. 

दरम्यान, Autumn Investment & Infrastructure Limited ही NBFC आहे. शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीच्या व्यवसायात कंपनी आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकली तर, डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६३.२९ कोटी रुपये होता. पण मार्च २०२३ च्या तिमाहीत कंपनीला तोटा झाला. मार्च तिमाहीत कंपनीला १३४.२८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: share market multibagger stocks authum investment and infrastructure share turn 48000 into crores know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.