शेअर बाजारात गेल्या 6 महिन्यांत ज्या थोड्या बहूत कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत, त्यांपैकी एक कंपनी म्हणजे Newgen Software. ही कंपनी सध्या बोनस शेअर्सच्या वितरणासंदर्भात चर्चेत आहे. कंपनीकडून सोमवारी यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते.
आयटी क्षेत्रातील या सॉफ्टवेअर कंपनीने 17 नोव्हेंबरला शेअर बाजाराला माहिती देताना म्हटले होते की, गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्यासंदर्भात 27 नोव्हेंबर 2023 रोजी निर्णय होईल. अर्थात उद्या होणाऱ्या कंपनी बोर्डाच्या मिटिंगमध्ये, गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर जारी होणार की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, बोनस शेअरच्या चर्चेमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
1 वर्षात 250 टक्क्यांनी वधारला शेअर - कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा 1269.15 रुपये प्रति शेअर होती. गेल्या 6 महिन्याच्या काळात कंपनीच्या शेअरमध्ये 100 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. तसेच, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षाच्या आधी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आतापर्यंत 258 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)