एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर लिमिटेड (HPL Electric and Power Ltd) कंपनीला 181 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. आज या शेअर्समध्ये 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE वर 322.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचली.
स्मार्ट मीटरसाठी वर्क ऑर्डर
एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर लिमिटेडने शेअर बाजारांला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अॅडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरकडून (Advanced Metering Infrastructure Service Provider) स्मार्ट मीटरसाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या संपूर्ण ऑर्डरची किंमत 181 कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदार मालामाल
एचपीएल इलेक्ट्रिक आणि पॉवर लिमिटेडच्या शेअरच्या किमती गेल्या 3 महिन्यांत 51 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर या वर्षी आतापर्यंत हा शेअर 28 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एक वर्ष गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून चांगले गेले. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 250 टक्क्यांनी वाढल्या. तर, ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपासून स्टॉक सांभाळून ठेवले, त्यांना आतापर्यंत 740 टक्के परतावा मिळाला आहे.
(टीप- हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)