Join us  

Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 8:40 AM

Share Market News : यंदा भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये २०२४ च्या सुरुवातीपासून सुमारे १२,०२६.०३ अंकांची वाढ झाली असून १६.६४ टक्के परतावा दिला आहे. अ

Share Market News : यंदा भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये २०२४ च्या सुरुवातीपासून सुमारे १२,०२६.०३ अंकांची वाढ झाली असून १६.६४ टक्के परतावा दिला आहे. अशा तऱ्हेनं गुंतवणूकदारांनी यंदा बाजारातून ११०.५७ लाख कोटी रुपयांची प्रचंड कमाई केली आहे.

यंदा वर्षभर बाजारात तेजी होती. यामुळे बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल १,१०,५७,६१७.४० रुपयांनी वाढलं आहे. यावरून थेट गुंतवणूकदारांच्या कमाईत किंवा मालमत्तेच्या मूल्यांकनात झालेली वाढ दिसून येते. वर्ष २०२४ मध्ये बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल (Market Cap) ४,७४,८६,४६३.६५ कोटी रुपये (५.६७ लाख कोटी डॉलर) होतं. २७ सप्टेंबर २०२४ रोजी कंपन्यांचं मार्केट कॅप ४७७.९३ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं. त्याच दिवशी बीएसई सेन्सेक्सने ८५,९७८.२५ अंकांची उच्चांकी पातळी गाठली.

तेजी मागचं कारण काय?

या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याच्या रूपानं झाला आहे. तज्ज्ञांनी बाजारातील या तेजीचं श्रेय देशांतर्ग चांगल्या तरलतेसोबतच अर्थव्यवस्थेची भक्कम पायाभूत तत्त्वं हे कारण असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) विक्रीच्या दबावानंतरही भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठू शकला. विशेषत: मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. अनेक शेअर्सनं उच्चांक गाठल्यानं किरकोळ गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली. या वर्षी आतापर्यंत बीएसईचा मिडकॅप निर्देशांक १२,६४५.२४ अंकांनी म्हणजेच ३४.३२ टक्क्यांनी वधारला आहे, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १४,७७७.०९ अंकांनी म्हणजेच ३४.६२ टक्क्यांनी वधारलाय.

भूराजकीय तणाव असूनही जागतिक बाजारांनीही तेजीला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेची व्याजदर कपात हा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांसाठी एक महत्त्वाचा सकारात्मक घटक आहे. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक