Join us  

'या' शेअरमध्ये तुफान तेजी, एक्सपर्ट्सनं दिलं 'बाय' रेटिंग; ७५० ₹ पर्यंत जाऊ शकतो स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 1:02 PM

शेअर बाजारात योग्य स्टॉक निवडणं हे सर्वात कठीण काम आहे. योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास बंपर रिटर्न मिळणे निश्चित आहे.

शेअर बाजारातीलगुंतवणूकीनं अनेकांना मोठा नफाही मिळवून दिलाय आणि अनेकांना मोठा फटकाही बसलाय. शेअर बाजारातगुंतवणूक करताना तुमचा अभ्यास असणं आणि तुमच्यात संयम असणं आवश्यक आहे. शेअर बाजारात योग्य स्टॉक निवडणं हे सर्वात कठीण काम आहे. योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास बंपर रिटर्न मिळणे निश्चित आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी यावर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या शेअर्समध्ये आजही तेजी पाहायला मिळत आहे. 

तज्ज्ञांनी अनेक शेअर्समध्ये बंपर उसळीचे संकेत दिले आहेत. जर तुम्हाला शेअर बाजारात बंपर नफा मिळवायचा असेल तर तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. असाच एक स्टॉक जिंदाल स्टील आणि पॉवरचा आहे. या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आजही या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक उसळी दिसून आलीये.

सकाळी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा शेअर ५७३.२० रुपयांवर व्यवहार करत होता. दुपारी कामकाजादरम्यान हा ५७३.२५ रुपयांवर गेला होता. गेल्या एक महिन्यापासून या शेअरच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिलं आहे. 

७४० वर जाऊ शकतो शेअरतज्ज्ञांनी जिंदाल स्टील अँड पॉवरच्या शेअरवर विश्वास व्यक्त केलाय. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, हा स्टॉक येत्या काही वर्षांत बंपर रिटर्न देऊ शकतो. तज्ज्ञांनी त्याच्या शेअर्सला बाय रेटिंग दिलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर ७४० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कंपनीची बॅलन्स शीट मजबूत आहे. तसंच टेक्निकल चार्टवरही कंपनी मजबूत स्थितीत आहे. पुढील तीन वर्षांत या स्टॉकमध्ये १०० टक्के रिटर्न पाहायला मिळू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गुंतवणूकदारांना बंपर रिटर्नतज्ज्ञांच्या मते, पुढील ३ आणि ५ वर्षांत EBITDA मध्ये १९ टक्के आणि १७ टक्के कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुढील ३ आणि ५ वर्षात EPS ३३ टक्के आणि २७ टक्क्यांनी वाढला आहे. जिंदाल स्टील अँड पॉवरचे सध्या सुरू असलेल्या विस्तार प्रकल्पांमुळे त्याचा नफा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास ४ हजार रुपये प्रति टनचं मार्जिन वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

(टीप - यामध्ये गुंतवणूकीसंदर्भात शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा