Lokmat Money >शेअर बाजार > रेल्वे स्टॉक्स सुस्साट; IRFC-RVNL च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, तुमच्याकडे आहे का..?

रेल्वे स्टॉक्स सुस्साट; IRFC-RVNL च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, तुमच्याकडे आहे का..?

आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली, पण या दरम्यान रेल्वेच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:07 PM2024-03-26T15:07:59+5:302024-03-26T15:08:12+5:30

आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली, पण या दरम्यान रेल्वेच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळ आहे.

Share Market News: Railway Stocks rise; IRFC-RVNL's share goes up | रेल्वे स्टॉक्स सुस्साट; IRFC-RVNL च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, तुमच्याकडे आहे का..?

रेल्वे स्टॉक्स सुस्साट; IRFC-RVNL च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, तुमच्याकडे आहे का..?

Share Market News:शेअर बाजारात आज(दि.26) मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजता BSE सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी कोसळून 72,420 च्या पातळीवर आला. तर Nifti 93 हून अधिक अंकांनी घसरुन 22,003 वर आले. शेअर बाजारातील या घसरणीदरम्यान रेल्वेच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्सपैकी फक्त 10 शेअर्समध्ये वाढ झाली. बजाज फायनान्सचे शेअर्स 2.45 टक्के वाढले, तर पॉवर ग्रिडचे शेअर्स सुमारे 2 टक्के घसरले.

या रेल्वे शेअर्समध्ये मोठी वाढ
मंगळवारी रेल्वे विकास निगम (RVNL) आणि IRFC च्या शेअर्समध्ये बंपर वाढ दिसून आली. IRFC चे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह 147 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते, तर रेल विकास निगम (RVNL share) चे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांच्या वाढीसह 264 रुपयांवर होते. याशिवाय IRCTC चे शेअर्स 0.12% च्या वाढीसह 929.80 रुपयांवर आले. याशिवाय, RailTel कॉर्पोरेशनचे शेअर्स 2 टक्के, Texmaco Rail 2.12 टक्के आणि Titagar Rail System च्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली.

काय आहे याचे कारण?
सरकारी मालकीच्या रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) सोबतचा करार. कोलकाता येथील अंडरपासचे कंत्राट मिळाले आहे. याची अंदाजे किंमत 229.43 कोटी रुपये आहे. यामुळे रेल्वेच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून येत आहे.

या शेअर्समध्ये घसरण
मंगळवारी गोदरेज कंझ्युमरचे शेअर्स 2 टक्क्यांनी, पॉवर ग्रिडचे शेअर्स 1.80 टक्क्यांनी, डिलिव्हरी शेअर्स 3 टक्क्यांनी, IIFL फायनान्सचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी आणि जेबीएम ऑटोचे शेअर्स 3.60 टक्क्यांनी घसरले.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Share Market News: Railway Stocks rise; IRFC-RVNL's share goes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.