Join us  

Share Market: Nifty चा नवा विक्रम; Sensex मध्ये ७४ अकांची तेजी, तरीही गुंतवणूकदारांना ₹२५,००० कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 4:17 PM

Share Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बुधवारी तेजी कायम होती. व्यवहारादरम्यान निफ्टीनं आपल्या नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर सेन्सेक्सही ७४ अंकांनी वधारला.

Share Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बुधवारी तेजी कायम होती. व्यवहारादरम्यान निफ्टीनं आपल्या नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर सेन्सेक्सही ७४ अंकांनी वधारला. मात्र, या तेजीला ब्रॉडर मार्केट सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं आज सुमारे २५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक जवळपास फ्लॅट बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी घसरला. सेक्टरल इंडेक्समध्ये केवळ आयटी, फार्मा आणि टेलिकॉम निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले. इतर सर्वच क्षेत्रांत नफावसुली दिसून आली.

व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ७३.८० अंकांनी वधारून ८१,७८५.५६ वर बंद झाला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी केवळ ३४.६० अंकांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह २५,०५२.३५ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीनं २५,१२९.६० चा नवा उच्चांक गाठला.

गुंतवणूकदारांचे २५ हजार कोटींचे नुकसान

बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल मंगळवारी ४६३.१४ लाख कोटी रुपयांवरून २८ ऑगस्ट रोजी ४६२.८९ लाख कोटी रुपयांवर आलं. अशा प्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे २५,००० कोटी रुपयांनी कमी झालं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २५ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी

आज बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी ११ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यामध्ये भारती एअरटेलच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.२ टक्क्यांची वाढ झाली. इंडसइंड बँक, इन्फोसिस, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स ०.५८ ते २.१७ टक्क्यांनी वधारले.

या शेअर्समध्ये घसरणतर सेन्सेक्सचे उर्वरित १९ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक १.२४ टक्क्यांनी घसरले. तर मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स ०.७६ ते १.११ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार