Join us

जोरदार विक्रीनंतर बाजार सपाट बंद; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये व्ही शेप रिकव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:46 IST

share market : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज उत्कृष्ट रिकव्हरी दिसून आली. गेल्या आठवड्यात बाजार सुमारे २ टक्क्यांनी घसरला होता.

share market : फेब्रुवारी महिन्यात विक्रमी घसरण झाल्यानंतर मार्च महिन्याची सुरुवातही काही खास झाली नाही. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार चढ-उतारानंतर रिकव्हरीसह बंद करण्यात यशस्वी झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली आहे. मिडकॅप निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीपासून सुमारे १,१६० अंकांच्या सुधारणेसह बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक आज जवळपास अर्ध्या टक्क्यांनी खाली बंद झाला.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर निफ्टी ५ अंकांनी घसरून २२,११९ वर तर सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरून ७३,०८६ वर बंद झाला. बँक निफ्टी २३० अंकांनी घसरून ४८,११४ वर बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक ६९ अंकांनी वाढून ४७,९८४ वर बंद झाला.

कुठले शेअर्स घसरले? कुठे वधारले?फेब्रुवारीमधील विक्रीच्या आकडेवारीनंतर, ऑटो स्टॉक्समध्ये संमिश्र कल दिसला, निफ्टी ऑटो इंडेक्स किंचित वाढीसह बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्रा, एस्कॉर्ट्स कुबोटा, आयशर आणि टीव्हीएसचे शेअर वाढीसह बंद झाले. तर मारुती, बजाज ऑटो, हिरो मोटो आणि टाटा मोटर्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सकारात्मक व्यवस्थापन कॉमेंट्रीनंतर अल्ट्राटेक शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. केबल कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. कोल इंडियाने आर्थिक वर्ष २०२५ साठी उत्पादन अंदाज कमी केला आहे, त्यानंतर त्याचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. रिॲल्टी शेअर्स, प्रेस्टिज इस्टेट्स, गोदरेज प्रॉपर्टीजचे शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सकारात्मक ब्रोकरेज नोट्सनंतर REC आणि PFC शेअर्स ४-५% वाढून बंद झाले. मिडकॅप्समध्ये कमिन्स, सीमेन्स आणि एबीबी सारखे कॅपेक्स समभाग सर्वाधिक वाढीसह बंद झाले. ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स, सुप्रीम इंड, वरुण बेव्हरेजेस, पीएफसी, अदानी ग्रीन यांचे शेअर ४-८% वाढले.

भांडवली बाजाराशी संबंधित शेअर्स दबावाखाली होते, एंजेल वन ९% घसरणीसह बंद झाले आणि एमसीएक्स ६% घसरून बंद झाले. IREDA, IFFL Fin आणि Titagarh Rail चे समभाग सलग दुसऱ्या दिवशी तोट्यासह बंद झाले. कंपनीने निवासी प्रकल्प सुरू केल्यामुळे एबी रिअल इस्टेट शेअर्स ७% वाढले. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी