Join us  

या कंपनीनंही खरेदी केले इलेक्टोरल बॉन्ड, शेअर धडाम; गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 4:43 PM

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच, म्हणजेच 14 मार्चलाच निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा आपल्या वेबसाइटवर टाकला आहे.

ईव्ही बस तयार करणाऱ्या ओलेट्रा ग्रीनटेकचा शेअर १५ मार्चला ५% ने घसरून १६८६.५० रुपयांच्या इंट्राडे नीचांकावर आला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका बातमीनंतर आली आहे. खरे तर, हिची होल्डिंग कंपनी असलेली मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ही इलेक्टोरल बाँड्सची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदीदार कंपनी होती, असे निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजांवरून समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच, म्हणजेच 14 मार्चलाच निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा आपल्या वेबसाइटवर टाकला आहे. MEIL ने 966 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते.

हैदराबादची कंपनी मेघा इंजिनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (एमईआयएल) एप्रिल 2023 मध्ये 140 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बांड खरेदी केले. याच्या पुढच्या महिन्यातच कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या नोडल एजन्सी एमएमआरडीएने लावलेल्या बोलीमध्ये एलअँडटीला मागे टाकत ठाणे ते बोरीवली प्रकल्पासाठी 14,400 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली.

महत्वाचे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) मंगळवारी सायंकाळी निवडणूक आयोगाला अशा संस्थांची माहिती सोपवली, ज्यांनी आता समाप्त झालेले इलोक्टोरल बॉन्ड खरेदी केले होते आणि राजकीय पक्षांनी ते स्वीकारले होते. एसबीआयने 2018 मध्ये योजना सुरू केल्यानंतर, 30 हप्त्यांमध्ये 16,518 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड जारी केले होते.

अशी आहे शेअरची स्थिती -15 मार्चला साधारणपणे 12 वाजताच्या सुमारास, बीएसईवर ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर 5% ने घसरून 1,701 रुपयांवर व्यवहार करत होता. हा शेअर एका आठवड्यात 11% ने घसरत आहे आणि डिसेंबर 2022 नंतर, आठवड्यातील आपल्या सर्वात खराब स्थितीकडे अग्रेसर आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 15 टक्क्यांनी घसरला आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक