Join us

Share Market Open : आधी घसरण, मग तेजी; सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये; विप्रो वधारला, हिंदाल्को आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 9:41 AM

Share Market Open : चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ८८ अंकांच्या घसरणीसह ७४९८६ वर तर निफ्टी २० अंकांच्या घसरणीसह २२८०१ च्या पातळीवर उघडला.

Share Market Open : चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ८८ अंकांच्या घसरणीसह ७४९८६ वर तर निफ्टी २० अंकांच्या घसरणीसह २२८०१ च्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप १००, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली, तर निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वधारत होते. सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्समध्ये ३०० पेक्षा अधिक अंकांची तेजी आली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये विप्रो, टेक महिंद्रा, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस, एचसीएल टेक, डिव्हिस लॅब आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये समावेश होता, तर जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, अदानी एंटरप्रायजेस, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, लार्सन आणि एसबीआय लाइफच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स प्री-ओपन मार्केटमध्ये ७५२१० वर तर निफ्टी २२७४२ च्या पातळीवर काम करत होता. 

मल्टिबॅगर शेअर्सची स्थिती काय? 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झाले तर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात गार्डन रीच शिपबिल्डर, कोचीन शिपयार्ड, रेल विकास निगम, टिटागड रेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, राइट्स लिमिटेड, गेल, इरकॉन इंटरनॅशनल, माझगाव डॉक, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, बीईएमएल लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनटीपीसी लिमिटेड, आयआरसीटीसी, कंटेनर कॉर्पोरेशन आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर एचएएलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी चार कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर सहा कंपन्यांचे समभाग वधारले. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये १.६२ टक्क्यांची तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार