Join us  

Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Bharti Airtel, हिंदाल्कोमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:05 AM

Share Market Opening Bell Today :कामकाजादरम्यान सेन्सेक्स ४०० अंकांच्या तेजीसह ८०४३९ अंकांवर पोहोचला. तर निफ्टी १५७ अंकांच्या तेजीसह २४५६३ अंकांवर पोहोचला.

आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी बाजार फ्लॅट ओपन झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ दिसून आली. मात्र, बाजाराच्या सुरुवातीलाच बँक निफ्टीवर दबाव होता. बँक निफ्टी रेड झोनमध्ये उघडला. त्यात सुमारे २०० अंकांची घसरण दिसून आली. परंतु थोड्या वेळानं सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी तेजी दिसून आली.

कामकाजादरम्यान सेन्सेक्स ४०० अंकांच्या तेजीसह ८०४३९ अंकांवर पोहोचला. तर निफ्टी १५७ अंकांच्या तेजीसह २४५६३ अंकांवर पोहोचला. सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी ५० मध्ये हिंडाल्को, भारती एअरटेल, कोल इंडिया, सन फार्मा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली, तर टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा कन्झ्युमर मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स घसरले.

मेटल, कमोडिटीज, एनर्जी, एफएमसीजी सेक्टरमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात खरेदी दिसून येत आहे. तर दुसरीकडे बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ सादर झाल्यानंतर बाजाराची हालचाल मंदावली आहे. सध्याच्या पातळीवर बाजार मजबूत होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) गुरुवारी २,६०५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर डीआयआयने २,४३१ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

टॅग्स :शेअर बाजार