Join us

Share Market Open : मंगळवारच्या घसरणीनंतर आज सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; एचयूएल वधारला, हिंदाल्कोमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:51 AM

Share Market Open : शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या प्रचंड घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ४८२ अंकांच्या वाढीसह ७२७५४ अंकांवर उघडला.

Share Market Open : शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या प्रचंड घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ४८२ अंकांच्या वाढीसह ७२७५४ अंकांवर तर निफ्टी १५३ अंकांनी वधारून २२०३७ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. निफ्टी मिडकॅप १००, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांकांत चांगली तेजी दिसून आली. पण काही वेळानं सेन्सेक्स-निफ्टीमध्ये थोडी घसरण झाली. 

टॉप गेनर/लूझर कोण? 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये एचयूएल, ओएनजीसी, महिंद्रा, बीपीसीएल, टाटा स्टील, ब्रिटानिया आणि कोल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर हिंदाल्को, लार्सन, पॉवर ग्रिड, अॅक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल आणि ग्रासिम इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांची तेजी दिसून येत होती. 

अदानी समूहाच्या शेअरची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये कार्यरत होते. अदानी एनर्जी सोल्यूशन १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरुन कार्यरत होता. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

बुधवारी प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ९१४ अंकांच्या वाढीसह ७२९९३ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी १५० अंकांनी वधारून २२०३४ च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचं कामकाज बुधवारी तेजीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून देण्यात आले होते.

टॅग्स :शेअर बाजार