Join us  

Share Market Opening 13 September: नफावसूलीचा दबाव, ऑल टाईम हाय वरून घसरला शेअर बाजार; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 9:51 AM

Share Market Opening 13 September: एका दिवसापूर्वी नवा ऐतिहासिक उच्चांक नोंदविल्यानंतर शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत शेअर निर्देशांकांनी किरकोळ घसरणीसह सुरुवात केली.

Share Market Opening 13 September: एका दिवसापूर्वी नवा ऐतिहासिक उच्चांक नोंदविल्यानंतर शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत शेअर निर्देशांकांनी किरकोळ घसरणीसह सुरुवात केली.

सकाळी सव्वानऊ वाजता सेन्सेक्स १०० अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीची सुरुवातही जवळपास २५ अंकांच्या घसरणीसह झाली. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स जवळपास १२० अंकांनी घसरून ८२,८५० अंकांच्या खाली व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक जवळपास ४० अंकांनी घसरून २५,३५० अंकांच्या जवळ होता.

देशांतर्गत बाजारात व्यवहार सुरू होण्याआधीच एका दिवसापूर्वीची गती कायम राहण्याची चिन्हे होती. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स सुमारे १३० अंकांच्या वाढीसह ८३,१०० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे ४२ अंकांच्या वाढीसह २५,४३० अंकांच्या वर व्यवहार करत होता. बाजार सुरू होण्यापूर्वी सकाळी गिफ्ट सिटीतील निफ्टी फ्युचर्स सुमारे ५६ अंकांच्या प्रीमियमसह २५,३९० अंकांवर व्यवहार करत होते. मात्र, बाजार उघडताच तो रेड झोनमध्ये गेला.

शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील सुमारे २० शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स १ ते १ टक्क्यांनी वधारले आहेत. तर एशियन पेंट्सचा शेअर १.६५ टक्क्यांनी घसरला. महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, आयटीसी, इन्फोसिस या कंपन्यांचे समभागही सुरुवातीला रेड झोनमध्ये आहेत.

जागतिक शेअर बाजारात तेजी

अमेरिकेच्या बाजारात गुरुवारी तेजी दिसून आली. वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ०.५८ टक्क्यांनी वधारला. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.७५ टक्के आणि टेक फोकस्ड निर्देशांक नॅसडॅक १ टक्क्यांनी वधारला. आज आशियाई बाजारात संमिश्र ट्रेंड दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी घसरला, तर टॉपिक्स निर्देशांक ०.५८ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि कॉस्डॅक फ्लॅट आहेत. हाँगकाँगच्या हँगसेंग निर्देशांकात आज तेजीची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :शेअर बाजार