Join us

Share Market : आठवड्याची दमदार सुरुवात करणारा शेअर बाजार सुस्त; दिग्गज आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:08 AM

Share Market Open Today: आठवड्याची चांगली सुरुवात करणारा भारतीय शेअर बाजार आज काहीसा बॅकफूटवर आलेला पाहायला मिळाला. यामध्ये सुरुवातीच्या व्यवहारात दिग्गज आयटी कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आहे.

Share Market : आठवड्याची दमदार सुरुवात केल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची थोडीशी सुस्त सुरुवात झाली. सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी घसरत होता. तर निफ्टी देखील घसरणीसह २५,९०० च्या खाली उघडताना दिसला. विक्रमी उच्च पातळीमुळे, बाजारात नफा बुकिंगचा दबाव दिसून येत आहे, ज्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी लाल रंगात व्यवहार करत उघडले. आज मिडकॅप निर्देशांकाने पुन्हा नवीन विक्रमी उच्चांक गाठताना दिसला.

सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स ८४,८६० अंकांवर किंचित घसरणीसह उघडला. निफ्टीची सुरुवात १८ अंकांच्या किंचित घसरणीसह २५९२१.४५ अंकांवर झाली. काही छोट्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला होता. सकाळी ९:२५ वाजता सेन्सेक्स सुमारे ८० अंकांनी घसरुन ८४,८५० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर NSE चा निफ्टी ५० निर्देशांक सुमारे १० अंकांच्या घसरणीसह २५,९२५ अंकांच्या जवळ होता.

बाजार उघडण्यापूर्वी मिळाले होते संकेतदेशांतर्गत बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वीच व्यवसायात दबाव वाढण्याची चिन्हे होती. प्री-ओपन सत्रात, सेन्सेक्स सुमारे ७० अंकांच्या घसरणीसह ८४,८६० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे १८ अंकांच्या घसरणीसह २५,९२० अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. गिफ्ट सिटीमध्ये सकाळी, निफ्टी फ्युचर्स सुमारे ७५ अंकांच्या प्रीमियमसह २५,९९० अंकांवर व्यवहार करत होते.

आठवठ्याची रेकॉर्डब्रेक सुरुवाततत्पूर्वी, या आठवड्याची शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. सोमवारी सेन्सेक्स ३८४.३० अंकांच्या (०.४५ टक्के) वाढीसह ८४,९२८.६१ अंकांवर बंद झाला. त्याआधी सेन्सेक्सने इंट्राडेमध्ये ८४,९८०.५३ अंकांचा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. तर निफ्टी५० ने इंट्राडेमध्ये २५,९५६ अंकांचा नवा विक्रम केला. व्यवहार संपल्यानंतर तो १४८.१० अंकांच्या (०.५७ टक्के) वाढीसह २५,९३९.०५ अंकांवर बंद झाला.

जागतिक बाजारातही तेजीभारतच नाही तर जागतिक बाजारातही अशीच तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी अमेरिकन बाजार चांगल्या स्थितीत बंद झाला. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.१५ टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाले. एस एण्ड पी ५०० निर्देशांकात ०.२८ टक्के आणि तंत्रज्ञान केंद्रित निर्देशांक नास्डॅकमध्ये ०.१४ टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे. जपानच्या शेअर बाजारातही चांगले संकेत मिळत आहे. सोमवारी निक्की १.४७ टक्के आणि टॉपिक्स १ टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.६ टक्के आणि कोस्डॅक ०.६८ टक्क्यांनी वधारत आहे. हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्स २.१८ टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट १ टक्के मजबूत झाला आहे.

सुरुवातीच्या व्यापारात बड्या शेअर्सला तोटासुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सवरील बहुतेक शेअर्स रेड सिग्नलमध्ये व्यवहार करत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, कोटक बँक या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यांना १ टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. इन्फोसिस व्यतिरिक्त, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांच्या आयटी शेअर्सध्येही घसरण आहे. दुसरीकडे मेटल शेअर्स बाजाराला साथ देत आहेत. टाटा स्टील २ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर JSW स्टील सुमारे १.८० टक्के नफ्यात आहे.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार