Join us  

Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीत आधी घसरण, मग किरकोळ तेजी; एशियन पेट्स वधारला, PSU शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 9:38 AM

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स १९१ अंकांनी घसरून ७६,३९३ अंकांवर तर निफ्टी १३ अंकांनी घसरून २३,२४६ अंकांवर उघडला. मात्र यानंतर त्यात किरकोळ तेजी दिसून आली.

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स १९१ अंकांनी घसरून ७६,३९३ अंकांवर तर निफ्टी १३ अंकांनी घसरून २३,२४६ अंकांवर उघडला. मात्र यानंतर त्यात किरकोळ तेजी दिसून आली. घसरणीनंतर सेन्सेक्स ४४ अंकांच्या तेजीसह ७६,५३४ अंकांवर पोहोचला. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात किंचित घसरण नोंदविली जात होती. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह कार्यरत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ओएनजीसी, एनटीपीसी, महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स सारख्या शेअर्सचा समावेश होता. 

मल्टिबॅगर शेअर्सची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आयआरसीटीसी, इरकॉन इंटरनॅशनल, टॅक्स मेको रेल, रेल विकास निगम, राइट्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनटीपीसी लिमिटेड, माझगाव डॉक शिप बिल्डर, टिटागड रेल, कंटेनर कॉर्पोरेशन, बीईएल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, कोल इंडिया, गार्डन रीच शिप बिल्डर, कोचीन शिपयार्ड, एनएमडीसी लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर गेल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली. लार्सन अँड टुब्रो, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएल टेक यांचे समभाग वधारले. तर अशोक लेलँड, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरले. 

गिफ्ट निफ्टीकडून तेजीचे संकेत 

चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी गिफ्ट निफ्टी ५० अंकांच्या वाढीवर काम करत होता. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचं वाटप झालं असून मागील सरकारमधील मंत्र्यांना महत्त्वाच्या मंत्रालयांवर कायम ठेवण्यात आलं आहे. यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गिफ्ट निफ्टी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीनं होऊ शकते, असे संकेत देत होता. निफ्टीवर निफ्टी फ्युचर्स ५५ अंकांनी वधारून २३,२८३ अंकांवर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजार