देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी (९ जुलै) ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्स जवळपास १८० अंकांनी वधारला. तर निफ्टीमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. आज बँक निफ्टी घसरणीसह उघडला, मात्र नंतर चांगली सुधारणा झाली.
सेन्सेक्स १४७ अंकांनी वधारून ८०,१०७ वर पोहोचला. निफ्टी ३१ अंकांनी वधारून २४,३५१ वर तर बँक निफ्टी ३५ अंकांनी घसरून ५२,३९० वर बंद झाला. मारुती सुझुकी, ब्रिटानिया या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आजही तेजी कायम राहिली.
सुरुवातीच्या व्यवहारात एफएमसीजी क्षेत्रात चांगली खरेदी दिसून येत असून लार्जकॅप एफएमसीजी शेअर्समध्ये अधिक खरेदीदार दिसत आहेत. ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर, आयटीसी, नेस्ले इंडिया यांसारख्या एफएमसीजी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी ५० लूझर्सममध्ये श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यूएस स्टील, बीपीसीएल, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा समावेश आहे. पीएसयू बँकेत किंचित वाढ दिसून येत आहे, तर ऑटो निर्देशांकात आज तेजी दिसून येत आहे. खासगी बँकाही फ्लॅट टू पॉझिटिव्ह व्यवसाय करत आहेत.