Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज बुधवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 263 अंकांच्या घसरणीसह 73640 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 79 अंकांच्या घसरणीसह 22374 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ होत होती.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा, डिवीज लॅब आणि हीरो मोटोकॉर्प यांच्या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली. तर टायटन, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, ब्रिटानिया, भारती एअरटेल, बीपीसीएल आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.
जर आपण शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोललो तर, हिंदुस्तान झिंक, एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टाटा कंझ्युमरचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
अदानींच्या शेअर्सची स्थिती काय?
गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी तीन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. अदानी पॉवर सुमारे चार टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर एसीसी लिमिटेड एक टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.
बुधवारी, प्री ओपनिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 147 अंकांच्या घसरणीसह 73757 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 67 अंकांनी घसरून 22385 अंकांच्या पातळीवर होता. शेअर बाजारामध्ये घसरण होऊ शकते असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.