Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Opening : शेअर बाजार सुस्साट; मेटल, आयटी क्षेत्रात तेजी; लार्जकॅप कंपन्यांच्या तिमाही निकालांवर नजर

Share Market Opening : शेअर बाजार सुस्साट; मेटल, आयटी क्षेत्रात तेजी; लार्जकॅप कंपन्यांच्या तिमाही निकालांवर नजर

Share Market Opening : शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. निफ्टीचं कामकाज ५९ अंकांच्या वाढीसह २५,०२३ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स १९६ अंकांच्या वाढीसह ८१,५७७ च्या पातळीवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:51 AM2024-10-14T09:51:33+5:302024-10-14T09:51:33+5:30

Share Market Opening : शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. निफ्टीचं कामकाज ५९ अंकांच्या वाढीसह २५,०२३ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स १९६ अंकांच्या वाढीसह ८१,५७७ च्या पातळीवर उघडला.

Share Market Opening Boom in share market Boom in metal IT sector A look at the quarterly results of large cap companies | Share Market Opening : शेअर बाजार सुस्साट; मेटल, आयटी क्षेत्रात तेजी; लार्जकॅप कंपन्यांच्या तिमाही निकालांवर नजर

Share Market Opening : शेअर बाजार सुस्साट; मेटल, आयटी क्षेत्रात तेजी; लार्जकॅप कंपन्यांच्या तिमाही निकालांवर नजर

Share Market Opening : शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी तेजीसह सुरू झालं. निफ्टीचं कामकाज ५९ अंकांच्या वाढीसह २५,०२३ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स १९६ अंकांच्या वाढीसह ८१,५७७ च्या पातळीवर उघडला. गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टीनं २५००० ची पातळी महत्त्वाची सपोर्ट लेव्हल म्हणून कायम ठेवली आहे. बाजारात अर्निंग सीझन सुरू झाला असून काही बड्या कंपन्या या आठवड्यात आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारात विप्रोच्या शेअर्समध्ये बरीच तेजी दिसून येत आहे. बाजार उघडताच विप्रोच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. निफ्टी ५० पॅकमधील इतर शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, एल अँड टी, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स सारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, सिप्ला या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मेटल, आयटी आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाले. बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्यानं विक्रीचा दबाव दिसून आला. येत्या आठवड्यात बाजाराची दिशा कॉर्पोरेट अर्निंगवर अवलंबून राहणार असून रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि एचसीएल टेक सारख्या बड्या कंपन्या आपले निकाल जाहीर करणार आहेत.

याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार भू-राजकीय तणाव, विशेषत: कच्च्या तेलाच्या किंमती आणि परदेशी निधी प्रवाहावर त्यांचा परिणाम यावर बारकाईनं लक्ष ठेवतील. आशियाई शेअर्समध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. सोमवारी आशियाई शेअर्समध्ये विशेष बदल झाला नाही.

Web Title: Share Market Opening Boom in share market Boom in metal IT sector A look at the quarterly results of large cap companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.